Breaking
ब्रेकिंग

संत दामाजी हायस्कूल मंगळवेढा येथे नशा मुक्त व सशक्त भारत अभियान ब्रँड अँबेसेडर महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनात उत्साहात संपन्न

0 7 6 9 4 1

संत दामाजी हायस्कूल मंगळवेढा येथे नशा मुक्त व सशक्त भारत अभियान ब्रँड अँबेसेडर महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनात उत्साहात संपन्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २६/ संत दामाजी हायस्कूल मंगळवेढा येथे नशा मुक्त व सशक्त भारत अभियान नशा मुक्त भारत चे ब्रँड अँबेसेडर व सशक्त भारत अभियान चे प्रशिक्षक महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक तांबोळी सर यांनी महेश वैद्य यांचा परिचय करून दिला. मुलांनी दररोज व्यायाम करावा आणि आपल्याला तंदुरुस्त ठेवावे आणि शास्त्र शुद्ध व्यायाम कसा करावा श्वास आणि शरीराची क्रिया कशी असावी याबद्दल कृती द्वारा मार्गदर्शन केले.

यावेळी मुलांनी कोणता आहार घेतला पाहिजे कोणते पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. मुलांनी भविष्यात कधीही व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन खराब करू नये. आपला देश सशक्त राष्ट्र बनवायचे असे तर देशातील युवक व्यसनमुक्त आणि सशक्त असला पाहिजे त्यासाठी मनावर ताबा असणे गरजेचे आहे. शाळकरी जीवनात मुलानी खेळाचा आनंद लुटावा असे मार्गदर्शन ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय हे ठरवले पाहिजे की आपल्याला काय व्हायचे आहे त्याप्रमाणे कठोर परिश्रम करणे गरजेचे आहे.

यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष स्व. रतनचंद शहा यांच्या पुण्य तिथी निमित्त त्यांना आदरांजली वाहून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच या उपक्रमास मंगळवेढा येथील आदर्श शिक्षक श्री दामोदर माने सर हे आवर्जून उपस्थित होते. तसेच ओंकार चिटणीस हे उपस्थित होते. ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य यांचा सत्कार श्री कडग सर यांच्या हस्ते करण्यात आला. हा उपक्रम मुक्त भारत अभियान सोलापूर जिल्हा समाज कल्याण विभाग तर्फे राबविण्यात आला. असे महेश वैद्य यांनी सांगितले.

तसेच पीएमओ ऑफिस मध्ये कार्यरत असणाऱ्या अमिषा यादव मॅडम कॉर्डिनेटर महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि असिस्टंट कमिशनर समाज कल्याण श्रीमती सुलोचना महाडिक मॅडम यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यास मदत होते असेही महेश वैद्य यांनी सांगितले. तसेच या वेळेस आपले मित्र स्व. दिनेश भाऊ सोरटे यांना श्रद्धांजली वाहिली. दिनेश भाऊ यांच्या या उपक्रमास अतिशय मनापासून सद्भभावना होत्या, सहकार्य होते. चांगल्या कामाबद्दल ते खूप कौतुक करत. असा मित्र खूपच लवकर सोडून गेला अशी भावना महेश वैद्य यांनी व्यक्त केली.

नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियान हे दोन्ही उपक्रम मंगळवेढा तालुक्यात राबविण्याचा मानस महेश वैद्य यांनी व्यक्त केला. हा उपक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. यावेळेस 245 विद्यार्थ्यांनी आणि 11 शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे