Breaking
ब्रेकिंग

पूर्वीच्या मंजूर विकास कामांची उद्घाटने करण्यातच विद्यमान आमदार धन्य; केम ढवळस रेल्वे भुयारी मार्गाच्या भूमिपूजन समारंभात मा. आ. संजयमामा शिंदे यांची टीका

0 7 6 9 3 4

पूर्वीच्या मंजूर विकास कामांची उद्घाटने करण्यातच विद्यमान आमदार धन्य; केम ढवळस रेल्वे भुयारी मार्गाच्या भूमिपूजन समारंभात मा. आ. संजयमामा शिंदे यांची टीका

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ११/ करमाळा तालुक्यातील केम ढवळस हा प्रमुख जिल्हा मार्ग क्रं 14 असून रेल्वे लाइन कि. मी. क्र. 359/26, 359/28 या मार्गांवर रेल्वे लाईन असल्यामुळे केम गावाच्या रेल्वे लाईन पलिकडे छोटी मोठी सुमारे 7 ते 8 गावे असून केम ढवळस व इतर गावांना जोडण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नसल्यामुळे गावातील लोकांना व आजूबाजूला असणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत होता. ही अडचण लक्षात घेऊन तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी रेल्वेच्या भुयारी मार्गासाठी प्रसंगी राज्य सरकारच्या बजेट मधून निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली होती. दरम्यान रेल्वे विभागाने सहकार्याची भूमिका दाखवत त्यांच्या बजेट मधूनच संबंधित भुयारी मार्गासाठी निधी मंजूर केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला.

आज दिनांक 11 जुलै रोजी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या शुभहस्ते या कामाचा भूमिपूजन समारंभ करण्यात आला. याप्रसंगी विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवरती त्यांनी टीकास्त्र सोडले. 2019 ते 24 या कालावधीत आपण मोठ्या प्रमाणावर विकास कामे मंजूर करून घेतली. याच कामांचे नारळ फोडण्याचे काम विद्यमान आमदार करत असून एकही नवीन काम त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अद्यापही मंजूर केलेली नाही. उलट मंजूर असलेली विकास कामे बंद करण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. एकीकडे दहीगाव उपसा सिंचन योजनेचे काम बंद नलिकेतून करावे अशी मागणी विधानपरिषद सभागृहांमध्ये आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील करत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते असलेले आमदार नारायण पाटील मात्र या कामाला विरोध करत आहेत. हा विरोधाभास का आहे? याचा जाब केम व वडशिवणे ग्रामस्थांनी विचारला पाहिजे. वडशिवणे तलावात पाणी दिले म्हणून डंका पेटवला जातो परंतु त्या तलावाला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आपण तत्कालीन जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2024 मध्येच पत्र दिले होते. दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम बंद नलिका वितरण प्रणालीतून झाल्यानंतर बचत होणाऱ्या 0.46 टीएमसी पाण्यामधून अतिरिक्त गावांना पाणी देता येईल. त्यामध्ये वडशिवणे तलावही आहे. एखाद्या भागाचा कायापालट करायचा असेल तर त्यासाठी कायमस्वरूपी तरतूद करावी लागते. विद्यमान आमदार मात्र वरवरची मलमपट्टी करण्यामध्येच व्यस्त आहेत. मागेल त्याला पाणी देण्याचे धोरण त्यांनी उन्हाळी आवर्तनात राबविले. त्याचा फटका कायमस्वरूपी योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या वरकटणे, सरपडोह, सौंदे, साडे या गावांना बसला. हे धोरण चुकीचे आहे असाही घनाघात त्यांनी केला.

यावेळी उद्धव दादा माळी, संदीप तळेकर प्रहार संघटना तालुकाध्यक्ष, अच्युत काका पाटील, विष्णू दादा पारखे, मारुती पारखे, उपसरपंच सागर कुरडे, केम ग्रा. पं. सदस्य गोरख काका पारखे, सुलतान मुलाणी, योगेश ओहोळ, विष्णू अवघडे, दत्तात्रय बीचितकर, विजयसिंह ओहोळ, सचिन काळे, उत्तरेश्वर सुरवसे, गणेश तळेकर, निंभोरे सरपंच रवींद्र वळेकर, अण्णासाहेब पवार, सूरज ढेरे, शिवसेना जिल्हा समन्वयक सागर राजे तळेकर, अरुण लोंढे चेअरमन, चंद्रकांत तळेकर सर, सचिन रणशिंगारे, संजय नवले, बालाजी अवताडे, धनंजय ताकमोगे, विकास कळसाईत, महादेव पाटमास, रिझवान झारेकरी, विष्णू ओहोळ, नागेश सुरवसे, बाजीराव तळेकर, राजू तळेकर, दीपक तळेकर, बळीराम तळेकर, नवनाथ सुरवसे, उत्तरेश्वर सुरवसे, संतोष कुर्डे, सुरेश देवकर, हरिभाऊ तळेकर, संजय आप्पा तळेकर, बापू तळेकर, अशोक तळेकर, पिनु तळेकर, अण्णासाहेब तळेकर, तानाजी तळेकर, कांतिलाल पवार, ईश्वर मस्के, दत्ता वळेकर, नाथ शिंदे, बाळू सुरवसे, राजेंद्र देवकर यांच्याबरोबरच जनई वस्ती, बीचितकर वस्ती व बाराबाई वस्ती वरील व ढवळस व केम पंचक्रोशीतील युवा वर्ग शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे