Breaking
ब्रेकिंग

गटारी बनवायला निधी नाही परंतु टर्फ बनवण्यासाठी 73 लाख रुपये मंजूर; शाळे पेक्षा टर्फ महत्त्वाचे

0 4 3 3 2 7

गटारी बनवायला निधी नाही परंतु टर्फ बनवण्यासाठी 73 लाख रुपये मंजूर; शाळे पेक्षा टर्फ महत्त्वाचे

प्रतिनिधी: राजेश बाष्टे

खोपोली: दि. १८/ खोपोली नगर परिषदेचा अजब कारभार सुरू आहे. शहरातील गल्लीबोळातील गटारी तुटलेल्या अवस्थेत असताना नागरिकांकडून प्रचंड प्रमाणात शहरातील साफसफाई बाबत, गटारी बनवण्याबाबत तक्रारी येत आहेत. नगर परिषदेकडे नवीन गटारी बनवण्यासाठी निवेदन दिले असता आमच्याकडे फंड उपलब्ध नाही अशी वल्गना केली जाते. परंतु शहरातील एका शाळेच्या समोरील छोटेसे पटांगण हडपून तेथे टर्फ बनवण्यासाठी 73 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.

शाळा महत्त्वाची आहे असे सांगितले असता खेळ महत्त्वाचे आहे असे उत्तर नगर परिषदेचे अधिकारी देतात. ज्या शाळेचा मागील दहा वर्षापासून दहावीचा निकाल शंभर टक्के लागत आहे. जेथे 80% मुली शिक्षण घेत आहेत. जी शाळा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्वप्न साकार करीत आहे. अशा माध्यमिक शाळेला दुय्यम प्राधान्य नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांतर्फे देण्यात येत आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे. नगर परिषदेला सदर शाळा क्रिकेटच्या टर्फ करिता बंद करायची आहे की काय अशी शंका येत आहे ?

एकही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची नाही परंतु त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट खेळण्यासाठी टर्फ हवा आहे ते सुद्धा लहान मुलांचे खेळण्याचे हक्क हिसकावून टर्फ बांधण्यासाठी आम आदमी पार्टीचा कालही विरोध होता आजही विरोध आहे आणि विरोधच राहील. लहान मुलांचा हक्काचा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही हा लढा लढतच राहणार असे आम आदमी पार्टी खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सांगितले. टर्फ बनवण्यासाठी आमचा विरोध नाही परंतु जागा चुकलेली आहे. शाळेच्या समोरील मैदानात लॉन टाकून शाळेच्या वेळात शाळेच्या मुलांनी तेथे सर्व प्रकारचे खेळ खेळावे व इतरत्र वेळात स्थानिकांनी त्याचा वापर करावा अशी आमची प्राथमिक मागणी आहे. तसेच सदर मैदानाचे कोणत्याही प्रकारे खाजगीकरण होऊ नये असे नगर परिषदेने लिखित मध्ये द्यावे अशी आम्ही मागणी केली होती असे आपचे प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी सांगितले.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे