कानिफनाथजी आखाडाच्या वतीने ५ दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव
कानिफनाथजी आखाडाच्या वतीने ५ दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव

प्रतिनिधी: महेश कांबळे
अहिल्यानगर: दि. ८/ भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या मढी येथे अखिल भारतीय ॐ श्री गुरू चैतन्य कानिफनाथजी आखाडाच्या वतीने दि. ८ ते ५ जुलै पर्यंत ५ दिवसीय गुरूपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आखाडा संस्थापक बाबा सुन्दरनाथजी महाराज यांनी दिली. अखिल भारतीय ॐ श्री गुरू चैतन्य कानिफनाथजी आखाडाला कुंभमेळा मध्ये मान्यता मिळाली असून त्यानंतरचा हा पहिलाच गुरुपौर्णिमा उत्सव आहे. दि ८ जुलै ला भेख़ भगवान साधु संत सम्मेलन, ९ जुलै ला दीक्षा शिबिर कार्यक्रम, १० जुलै ला सद्गुरू कानिफनाथ चरण पूजन, ११ जुलै ला अखाडे के विस्तार, प्रचार, प्रसार, पर चर्चा बैठक, १२ जुलै ला भेख भगवान साधु संत विदाई समारोह होणार आहे.
अखिल भारतीय ॐ श्री गुरू चैतन्य कानिफनाथजी आखाडा, श्री क्षेत्र मढीच्या वतीने सर्व नाथभक्ताना गुरूपौर्णिमा महोत्सव मोठया संख्नेने उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तुळजाभवानी पानदरा देवी पर्ण कुटिया, श्री क्षेत्र मढी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर येथे बाबा सुखबीरनाथ महाराज व बाबा विजयनाथ महाराज यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आखाड्याच्या वतीने करण्यात आले आहे.



