शिशुविहार प्राथमिक शाळेचा ६४ वा वर्धापन दिन साजरा
शिशुविहार प्राथमिक शाळेचा ६४ वा वर्धापन दिन साजरा
प्रतिनिधी राजेश बाष्टे
अलिबाग: दि. ०३/ ता. शि. प्र. मंडळाच्या अलिबाग येथील शिशुविहार प्राथमिक शाळेचा ६४ वा वर्धापन दिन संस्थेचे अध्यक्ष बळवंत वालेकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर शाळेत साजरा झाला. यावेळी गटशिक्षणाधिकारी सुनिल गौळी व शिक्षण विस्तार अधिकारी क्रुष्णा पिँगळा प्रमुख अतिथीलाभले. यावेळी गट शिक्षणाधिकारी सुनिल गौळी, विस्तार अधिकारी क्रुष्णा पिंगळा, संस्थेचे अध्यक्ष बळवंत वालेकर, सेक्रेटरी द. ल. माळवी तसेच विद्यार्थी साही बंदरी व अर्णव पवार यांची शिशूविहार शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख दर्शविणारी भाषणे झाली.
यावेळी ग. शि. अ. यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अलिबागचे गट शिक्षणाधिकारी तथा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुनिल गौळी यांचा ५१ वा वाढदिवस त्यांच्या हस्ते केक कापून साजरा केला. यावेळी शिक्षिकांनी त्यांचे औक्षण केले. शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अलिबागचे व्यापारी व दानशूर सद्ग्रुहहस्थ जयंतीलाल शाह यांनी शिशुविहार शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन इ. साहित्य मोफत दिले. सदर साहित्याचे वाटप शाळेच्या वर्धापनदिनी प्रमुख अतिथींच्याहस्ते करण्यात आले.
त्यानंतर संस्थेच्या मुख्याध्यापकांची आढावा बैठक घेण्यात आली. सदरवेळी विद्यार्थी संख्या, शैक्षणिक उपक्रम, शाळेतील दैनंदिन अडचणी यांचा उहापोह करण्यात आला. संस्थेच्या सर्व ९ शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढलेला असल्यामुळे जीवघेण्या स्पर्धेतही सदर संस्था कार्यरत आहे. शासनाच्या निकषानुसार विद्यार्थी संख्या सुयोग्य आसल्यामुळे एकाही शाळेला बंद हौण्याचा धोका नाही.
या कार्यक्रमाचे सूत्रसंंचालन विलास पनासे (भोवाळे ) यांनी केले तर आभार शिशुविहार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्याणी वेखंडे यांनी मानले. या वर्धापनदिन कार्यक्रमास संस्थाध्यक्ष बळवंत वालेकर, सेक्रेटरी द. ल. माळवी, गट शिक्षणाधिकारी सुनिल गौळी, शिक्षण विस्तार अधिकारी क्रुष्णा पिंगळा, संचालिका श्रीमती सुषमा सोमण, मुख्याध्यापक सर्वश्री शिवाजी दराडे, सिताराम जाधव, समीर पाटील, विजय नांदगावकर, गुलाब काळे, विलास पनासे, सौ. साधना पाटील, सौ. प्रतिभा पाटील, सौ. स्नैहा पाटील, सौ. कल्याणी वेखंडे, तसेच बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते.



