कुणबी मराठा जातीची नोंद व जात पडताळणीसाठी लाखो रुपये घेणाऱ्या एजंटवर तात्काळ कारवाई करावी व तात्काळ दाखले मिळावेत:- सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन
कुणबी मराठा जातीची नोंद व जात पडताळणीसाठी लाखो रुपये घेणाऱ्या एजंटवर तात्काळ कारवाई करावी व तात्काळ दाखले मिळावेत:- सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २२/ इ. १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर, जनरल रजिस्टीवर कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा जातीची नोंद होण्याबाबत व जात पडताळणी ऑफिसला एजंट लाखो रुपये घेऊन पडताळणी करत आहेत त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी असे विनंतीपूर्वक निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले.
निवेदनात केलेल्या मागण्या पुढील प्रमाणे:- शैक्षणिक सत्र २०२५-२०२६ या वर्षात इयत्ता १ ली मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या व ज्या पालकाकडे कुणबी /मराठा कुणबी / कुणबी मराठा जातीचा दाखला उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांची जात जनरल रजि. नं. १ मध्ये वरीलप्रमाणे नमूद करण्यासंर्दभात आपल्या सोलापूर जिल्हापरिषद अंतर्गत असणाऱ्या सर्व तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, खाजगी व अनुदानित शाळा, सव्यंअर्थसहाय्य शाळा व इतर व्यवस्थापन शाळा प्रमुख तसेच गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांना लेखी आदेशित करावे ही नम्र विनंती. इयत्ता २ री ते १२ वी पर्यंत शाळेत दाखल असणाऱ्या व ज्या विद्यार्थ्याचे हिंदू कुणबी / मराठा – कुणबी / कुणबी – मराठा जातीचे दाखले उपलब्ध आहेत अशा विद्यार्थ्यांच्या जनरल रजि. मध्ये जातीची नोंद बदल करण्याचे प्रस्ताव सर्व गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत शिक्षणाधिकारी प्राथमिक व उच्च माध्यमिक जिल्हा परषिद सोलापूर कार्यालयास मंजुरीसाठी सर्व प्राथमिक / उच्चमाध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनास गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत सादर करावेत असे आदेश जिल्हाधिकारी या नात्याने आपण द्यावेत ही नम्र विनंती.
तसेच जात पडताळणी ऑफिस सोलापूर येथे एजंट लोकांचा सुळसुळाट झाला आहे. एजंट व अधिकारी यांच्याकडून लाखो रुपयांची लूट होत आहे या लोकांच्यामुळे सर्वसामान्य लोकांची प्रकरणे पेंडिंग पडत आहेत. जर एजंट लोकांना पैसे दिले नाहित तर प्रकरणे होत नाहीत असा प्रकार जात पडताळणी ऑफिस सोलापूर येथे चालू आहे. याबाबत आपण गांभिर्याने घेऊन तात्काळ उपाययोजना करावी व पेंडीग प्रकरणे लवकरात लवकर पडताळणी करुन घ्यावेत व विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले द्यावेत ही विनंती. जे एजंट पैसे घेऊन अधिकाऱ्यांना हाताशी धरुन लोकांना त्रास देत आहेत त्या अधिकाऱ्यावर व एजंटवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत असे सकल मराठा समाज यांच्या वतीने आपणास सुचित करण्यात येत आहे.
यावेळी मराठा समन्वयक मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, मराठा जिल्हा समन्वयक माऊली पवार, चापले सर, सकल मुस्लिम समाज अध्यक्ष जमीर सय्यद, सुजित बागल, सचिन पवार, तायर मुलानी आधी बांधव उपस्थित होते.



