अलिबागच्या भाल येथील प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रुद्र पवार याला शिष्यव्रुत्ती
अलिबागच्या भाल येथील प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रुद्र पवार याला शिष्यव्रुत्ती
प्रतिनिधी: राजेश बाष्टे
अलिबाग: दि. १३/ अलिबाग तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या भाल यैथील उच्च प्राथमिक शाळेचा विद्यार्थी रुद्र राजाराम पवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे आयोजित पूर्व उच्च प्राथमिक शाळा शिष्यव्रुत्ती परीक्षेत ६१.३३ टक्के गुण मिळवून ग्रामीण विभागात शिष्यव्रुत्तीधारक बनला. या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष बळवंत वालेकर, सेक्रेटरी द. ल. माळवी, तत्कालीन मुख्याध्यापिका सौ. रैश्मा वारगे यांनी व अन्य शिक्षकांनी या विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.
रुद्र पवार हा माथाडी कामगाराचा मुलगा असून, तो झोपडपट्टीत राहतो. तो मूलतः हुशार असून पहिल्या इयत्तेपासून आजपर्यंत प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. केंद्र शासन संचालित नवोदय विद्यालय निजामपूर (ता. माणगाव) येथे इ. ६ वीच्या प्रवेश परीक्षेत तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला असून सध्या तो केंद्र शासनाच्या नवोदय विद्यालय निजामपूर या निवासी शाळेत इ. ६ वीत शिकत आहे.



