Breaking
ब्रेकिंग

संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे श्री गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत

0 7 6 9 4 3

संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे श्री गणरायाचे मोठ्या उत्साहात स्वागत

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. २७/ जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ संचलित संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे श्री गणेश उत्सव निमित्त श्री गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझीम ढोल ताशाच्या, गजरामध्ये मोठ्या उत्साहाने श्री गणरायाचे स्वागत केले.

गणरायांची मिरवणूक बार्शी रोड, माऊली नगर, करमाळा चौक, श्रीराम मंदिर, रेल्वे कॉलनी, देवकते वस्ती, या मार्गाने काढण्यात आली. ढोल ताशाच्या गजरामध्ये सर्व परिसर दुमदुमून गेला होता. ओम उद्योग समूह चे प्रमुख श्री संतोष चव्हाण यांच्याकडून विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला व चव्हाण परिवारातर्फे श्रींची आरती करण्यात आली.

या उपक्रमाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार टोणपे सर, संस्थेचे सचिव श्री रोहन टोणपे सर कोषाध्यक्ष डॉ. श्री रोहित टोणपे सर यांनी कौतुक व अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

3/5 - (2 votes)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे