हिवरगाव पावसा येथील जिल्हा परिषद शाळेत नवोदित विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत
हिवरगाव पावसा येथील जिल्हा परिषद शाळेत नवोदित विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत
संगमनेर प्रतिनिधी/ नितीनचंद्र भालेराव
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील जिल्हा परिषद शाळेत नवोदित विद्यार्थ्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले.शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन पुष्पवृष्टी करत मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे, शूजचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी सरपंच सुभाष गडाख,उपसरपंच सुजाता दवंगे,भाजपा माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,
भाजप तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,शिवसेना जिल्हा पदाधिकारी सोमनाथ भालेराव, यांच्या सह इतर मान्यवर उपस्थितीत होते.
मुख्याध्यापक सुरेश नगरे यांनी मागील वर्षी विद्यार्थ्यांनी मिळवलेले यशाची माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुरेश नगरे,शिक्षक राजेश नवले,रंजना नगरे, हरीभाऊ सहाणे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पावसे व सर्व सदस्य,शिक्षक वृंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव पावसा यांनी प्रयत्न केले.विद्यार्थ्यांच्या प्रवेश उत्सवास पाठिंबा देण्यासाठी हिवरगाव पावसा गावातील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.