Breaking
ब्रेकिंग

दिवेआगारचा सर्वेश पारकर झाला सातासमुद्रापार बँकिंग आणि फायनान्स मास्टर्स; माजी सैनिकाच्या मुलाचे सर्वत्र कौतुक

0 7 6 9 4 3

दिवेआगारचा सर्वेश पारकर झाला सातासमुद्रापार बँकिंग आणि फायनान्स मास्टर्स; माजी सैनिकाच्या मुलाचे सर्वत्र कौतुक

प्रतिनिधी: राजेश बाष्टे

अलिबाग: दि. १२/ श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील सुपुत्र सर्वेश श्रुती सुनील पारकर याने जिद्द व ध्येयाने इंग्लंड येथील बांगोर युनि्व्हर्सिटी मध्ये विद्यापिठातून डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण होत पदव्युत्तर बँकिंग आणि फायनान्स विषयात मास्टर्स पदवी संपादन केली आहे. नुकतेच इंग्लंड मधील विद्यापीठात एका शानदार पदवी प्रदान (कन्व्होकेशन) समारंभात सर्वेश पारकर याला सन्मानित करण्यात आले आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील असणारा सर्वेश अभ्यासात अत्यंत हुशार, मनमिळाऊ पण तितकाच खोडकर होता शिवाय लहानपणा पासून आर्मी स्कूल ते पुढे KSV दहावी पर्यंत शिक्षण व त्यानंतर नॉवेल इन्स्टिट्यूट एकरावी व बारावी सायन्स व पुण्यातील गरवारे उच्चभ्रू विद्यापीठातून BBA बॅचलर डिग्री घेतली नंतर पुढे त्याने परदेशातून मास्टर्स डिग्री करण्याचे ठरवले व त्यासाठी काही ऑनलाईन exam त्याने दिल्या त्यात त्याला उत्तम मार्क्स आणि साडे चार लाख कॉलरशिप मिळवून पुढे एज्युकेशन लोन व बाकी बाकीचे सर्व गोष्टीचा वर्ष भर अभ्यास करून त्याने आपले निर्णय पालकांना सांगितले. काही वेळा साठी त्यांनीं हे शक्य होईल का ही शंका घेतली. पण त्यांचे आत्मविश्वास आणि निर्धार बघून त्यांनी त्याला पूर्णपणे सहाय्य केले.

सर्वेश पारकर याचे वडील सुनील पारकर हे निवृत्त सैनिक असून आई श्रुती पारकर या अभिनेत्री आहेत. पुढील उच्च शिक्षण साता-समुद्रापार इंग्लड येथील बांगोर युनिव्हर्सिटी मधुन डिस्टिंक्शन मिळवून मास्टर्स इन बँकिंग अँड फायनान्स पदव्युत्तर पदवी संपादीत करत उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. सर्वेशमध्ये जन्मजात उत्तम संघटन कौशल्य त्याचे ठायी असल्याने त्याचा मित्र परिवारही खुप मोठा आहे. अनेक सामाजिक कार्यातही तो हिरहिरिने सहभागी होतो. भारतात असताना त्याने रक्तदान केलेच पण तिकडे प्रदेशातही तो रक्तदान करतोय. आर्थिक उद्योगातील उत्पादने आणि सेवांसाठी नाविन्यपूर्ण असे तंत्रज्ञान संपादन केल्याने सर्वेशला पुढील आयुष्यातील वाटचालीत नक्कीच उपयुक्त ठरेल.

सर्वेशचे संपूर्ण श्रीवर्धनकरांकडुन विशेष कौतुक होत असुन समाजाचे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे