Breaking
ब्रेकिंग

डॉ. विजयराव बिले यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न

0 7 6 9 4 3

डॉ. विजयराव बिले यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. ३०/ करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील माजी प्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. विजयराव बिले यांचा सेवापूर्ती निमित्त सत्कार सोहळा महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासराव घुमरे सर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विचारपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. बी पाटील, सौ. मनिषा बिले, श्री ऋषिकेश बिले इं. उपस्थित होते.

याप्रसंगी ऋषिकेश बिले यांची निवड सहायक, वित्त व लेखाधिकारी या पदावर पं. स. बारामती या ठिकाणी झाल्याबद्दल सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विलासराव घुमरे सर म्हणाले की, प्राध्यापक हा अष्टपैलू असावा त्याने त्याचे शैक्षणिक कार्य प्रामाणिकपणे पार पाडावे, हे सर्व गुण प्रा. डॉ. विजयराव बिले यांच्यामध्ये आहेत. विजयराव बिले यांचे अध्यापन हे विद्यार्थ्याभिमुख असे होते असे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल बी पाटील म्हणाले की विजयराव बिले एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सेवा काळात विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडविल्या. या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांमधून कु. काजल नगरे, प्रतिभा लंगोटे, अमृता सांगडे, कांचन दळवे, मयुरी भोसले तसेच प्राध्यापकांपैकी प्रा. हर्षद जाधव, प्रा. ऋषिकेश माने, प्रा. रूपाली थोरात यांनी आपल्या मनोगत मधून विजयराव बिले यांचे व्यक्तिमत्व उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सत्कारमूर्ती डॉ. विजयराव बिले यांनी सत्कारास उत्तर देताना म्हटले की मी बालवयापासून करमाळ्यामध्ये राहिलेलो आहे. माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण हा आदरणीय घुमरे सरांच्या साक्षीने घडला आहे. ते माझे सर्वात मोठे आदर्श आहेत आणि त्यांच्यामुळेच आज मी जीवनातील यशाच्या शिखरावर पोहोचलो आहे व इथून पुढेही मी त्यांचा कायम ऋणी राहील.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शशिकांत अवचर यांनी केले. सूत्रसंचालन साक्षी मगर व सायली साळुंखे यांनी तर आभार प्रदर्शन करण पोळ याने मानले. या कार्यक्रमास यशवंत परिवारातील सर्व सदस्य व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे