Breaking
ब्रेकिंग

युनिटी ऑफ मुलनिवासी समाज संघटनेच्या वतीने प्रशिक्षण शिबीर संपन्न

0 7 6 9 4 3

युनिटी ऑफ मुलनिवासी समाज संघटनेच्या वतीने प्रशिक्षण शिबीर संपन्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०४/ करमाळा येथे युनिटी ऑफ मूलनिवासी समाज या सामाजिक संघटनेच्या वतीने, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशाला येथे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. सदरच्या प्रशिक्षण शिबिरासाठी करमाळा तालुक्यातील विविध भागातून वैचारिक व्यक्तिमत्त्वांनी उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कमलाकांत काळे सर राष्ट्रीय अध्यक्ष (युनिटी ऑफ मूलनिवासी समाज) हे होते, तर सदरच्या कार्यक्रमाचे उद्घाटक नितीन खटके व प्रमुख उपस्थिती नागेश कांबळे, दीपक ओहोळ, सचिन काळे, रवींद्र बंडगर, हनुमंत विटकर, आदमभाई शेख, जमीरभाई सय्यद, महेंद्र जगदाळे हे होते. यावेळी उपस्थितांचा सन्मान कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कमलाकांत काळे यांनी बोलताना सांगितले की, सध्या समाजामध्ये संविधान संपविणार! या भीतीखाली अनेक पक्ष राजकारण करत आहेत. व स्वतः सत्तेमध्ये जात आहेत. कारण संविधान संपविणे ही भीती व संविधान संपु न देणे, हा समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण करून देणे अशी समाजव्यवस्था सध्या आपल्याला निर्माण करावी लागेल. कारण जी व्यवस्था समाजामध्ये भीती निर्माण करते, ती कधीच समाजाला मुख्य प्रवाहामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे समाजामध्ये अनेक आंबेडकरवादी संघटना आहेत. प्रत्येकाची विचारधारा ही संविधान संपविण्याचे तर नक्कीच नाही, परंतु मार्ग वेगवेगळे असले तरी प्रत्येकाला एकाच विचारधारेकडे प्रवाहित व्हायचे आहे त्यामुळे समाजामध्ये विविध संघटनांच्या नावाखाली राजकीय पक्ष त्यांची स्वतःची पोळी भाजून घेताना दिसून येत आहेत. जर समाजाला मुख्य प्रवाहात घेऊन यायचे असेल, तर आपल्याला बुद्ध, महावीर तसेच विविध संतांनी, महापुरुषांनी जी विचारधारा बहुजन समाजामध्ये रुजविलेलीे आहे त्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार समाजामध्ये सातत्याने करावा लागणार आहे तरच समाजामध्ये वैचारिक परिवर्तन शक्य आहे अशा प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन कमलाकांत काळे यांनी केले.

सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कांबळे यांनी केले. तर प्रास्ताविक सिद्धार्थ वाघमारे यांनी केले. सदरचा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकरवादी चळवळ, भारतीय बौद्ध महासभा, युवा भिमनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

यावेळी युनिट ऑफ मूलनिवासी समाज या सामाजिक संघटनेचे, दि. 10 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे दुसरे राज्य अधिवेशन संपन्न होणार आहे. त्या तयारी अंतर्गत करमाळा येथे सदरचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. यावेळी या कार्यक्रमामध्ये समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे