जागेचा निकाल देत नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून सरपंच शरद पवार आणि सरोदे कुटुंबीयांचे अहिल्यानगर तहसील कार्यालयातचं चूल मांडून आंदोलन

जागेचा निकाल देत नसल्याने गेल्या आठ दिवसांपासून सरपंच शरद पवार आणि सरोदे कुटुंबीयांचे अहिल्यानगर तहसील कार्यालयातचं चूल मांडून आंदोलन
प्रतिनिधी: महेश कांबळे
अहिल्यानगर: दि. २६/ अहिल्यानगर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात गेल्या आठ दिवसांपासून सरोदे कुटुंब आणि चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी सुरू केलेले उपोषण आता थेट चुलीवर पिठलं-भाकरी बनवून अनोख्या पद्धतीने उग्र होत चालले आहे. अन्यायाविरोधात झगडणाऱ्या या कुटुंबाने आज उपोषणाला आगळं वेगळं रूप दिलं असून,”आता तहसीलच आमचं घर! “असा निर्धार करत चुली पेटवून कार्यालयातच जेवण सुरू केलं आहे.
शरद पवार, अरुण रोडे आणि सरोदे कुटुंबीय गेल्या आठवड्यापासून त्यांच्या चोरलेल्या जागेबाबत न्याय मागण्यासाठी तहसीलच्या दरवाजात ठाण मांडून बसले आहेत.या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी वेळ आहे पण न्याय द्यायला वेळ नाही अशी घणाघाती टीका सरपंच शरद पवार यांनी प्रशासनावर केली आहे.आम्ही आमचं घर सोडून इथे आलो आहोत. आधी काही सहकाऱ्यांनी जेवण दिलं पण आता आम्ही स्वतः चुलीवर पिठलं-भाकरी करून खाण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आमचं हक्काचं स्थान परत मिळत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असा इशारा सरपंचांनी दिला.
कालच सभापती राम शिंदे यांनाही निवेदन देण्यात आलं असून, तरीही तहसील प्रशासनाकडून ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. त्यामुळे आजपासून हे आंदोलन करण्यात येतं आहे.