गणपती दान व निर्माल्य दान या उपक्रमास करमाळ्यात खूप चांगला प्रतिसाद
गणपती दान व निर्माल्य दान या उपक्रमास करमाळ्यात खूप चांगला प्रतिसाद

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. ०८/ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा करमाळा, करमाळा नगरपरिषद यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणारा गणपती दान व निर्माल्य दान हा उपक्रम विविध ठिकाणी राबविण्यात आला. करमाळ्यातील नागरिकांनी व छोट्या बालकांनीही छोटे मोठे गणपती मूर्ती व निर्माल्य दान केले. नगरपरिषद मुला मुलींची शाळा नंबर ४ येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत रामचंद्र बोधे व पांडुरंग वीर सर यांचा घरगुती गणपती दान घेतला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे अंनिसचे जिल्हा सचिव अनिल माने यांनी गणपती दान व निर्माल्य दान हे करण्यामागील काय उद्देश आहे याविषयी विस्तृतपणे माहिती सांगितली व गणपती दान व निर्माल्य दान या विषयावरती आधारित एक चळवळीचे गीत गाऊन नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
गणेश विसर्जन मार्गावरती करमाळा नगरपरिषद जवळ एक मंडप टाकून करमाळा नगरपरिषद करमाळा यांचे कर्मचारी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते यांनी सर्व गणेश मंडळाचे स्वागत केले. यावेळी करमाळा शहरातील भाऊराव शेळके, ओमराजे शेळके, अखिलेश कांबळे, शंभूराजे वगरे, संदीप शिर्के, रणवीर खिल्लारे, अतुल दुधे, लक्ष्मण भंडारे, राजाभाऊ गुंजेगावकर, वैभवी विधाते यांनी गणपती दान व निर्माल्य दान केले. यावेळी अनेक घरगुती गणपती व निर्माल्य दान देण्यासाठी लोक येत होते.
यावेळी करमाळा नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सोमनाथ सरवदे साहेब, अंनिसचे करमाळा तालुका कार्याध्यक्ष दिगंबर साळुंके, मा. प्राचार्य नागेश माने, ज्येष्ठ कवी प्रकाश लावंड, संजय हंडे, संतोष कांबळे, चंद्रकांत पवार, आप्पासाहेब लांडगे, मोरेश्वर पवार, राजेंद्र साने सुनील गायकवाड, मुकुंद मुसळे, बाळासाहेब दुधे, संतोष माने, विक्रम राऊत, चंद्रकला टांगडे, अर्चना ताटे, शाळा नंबर ४चे सर्व शिक्षक, गंगाराम तालीम मित्रमंडळाचे अमोल लावंड व सर्व कार्यकर्ते तसेच नगर परिषदेचे कर्मचारी प्रदीप शिंदे, विक्रम कांबळे, अनुप कांबळे, महादेव कांबळे, प्रदीप चौकटे, प्रशांत खारगे, दत्तात्रय घोलप, गजानन राक्षे, मल्हारी चांदगुडे, बाळनाथ क्षीरसागर, नंदू कोरपे, किरण कोरपे, प्रणित कांबळे, विक्रम कांबळे, जब्बार खान, राजेंद्र झाडबुके, बद्रीनाथ गायकवाड, अमोलसिद्ध परशेट्टी, इं. उपस्थित होते.



