Breaking
ब्रेकिंग

सीना कोळगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांना बुडीत शेत जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी रक्कम रु 9,71,95,000/ वाढीव मोबदला मंजूर:- सतीश नीळ

0 7 6 9 4 3

सीना कोळगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांना बुडीत शेत जमिनीच्या नुकसान भरपाईसाठी रक्कम रु 9,71,95,000/ वाढीव मोबदला मंजूर:- सतीश नीळ

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. ०७/ करमाळा तालुक्यातील सीना कोळगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांना बुडीत झालेल्या शेत जमिनीच्या नुकसान भरपाई देण्यासाठी रक्कम रु. 9,71,95,000 एवढा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती श्री मकाई सह साखर कारखाना संचालक व सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील यांनी दिली. पुढे बोलताना श्री नीळ यांनी सांगितले की, सीना कोळगाव धरण प्रकल्पा साठी मौजे निमगाव (ह) येथील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्यांना नुकसान भरपाई ची रक्कम ही अत्यंत तुटपुंजी स्वरूपात देण्यात आली होती त्यामुळे धरणग्रस्त शेतकरी बांधवांनी भू संपादन अधिनियम १८९४, कलम २८ अ खाली वाढीव मोबदला मिळावा म्हणून अँड. सूर्यकांत सरडे यांच्या मार्फत दावे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार मा.कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी, मा. जयश्री आव्हाड उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी यांनी सदरील दावे मंजूर केले आहेत. त्याची रक्कम रु 9 कोटी 71 लाख 95 हजार रुपये एवढा निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे कार्यकारी अभियंता, सीना कोळगाव प्रकल्प विभाग परांडा यांना कळविले आहे.

याकामी ग्रामीण विकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल, शिवसेना नेते दिग्विजय बागल यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सदरील निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा व बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.

तसेच शेवटी श्री नीळ यांनी राज्याचे ग्राम विकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल व शिवसेना नेते दिग्विजय भैय्या बागल व ॲड. सूर्यकांत सरडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे