Breaking
ब्रेकिंग

जात पडताळणी संदर्भात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची भेट घेऊन केली चर्चा

0 7 6 9 4 3

जात पडताळणी संदर्भात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची भेट घेऊन केली चर्चा

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. २१/ जात पडताळणी संदर्भात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पुणे येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सचिन काळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांची पुणे येथे भेट घेतली व त्यांना सोलापूर येथील जात पडताळणी ऑफिस संदर्भामध्ये ऑफिस मध्ये सर्वच समाजातील लोकांना किती त्रास दिला जातो हे सविस्तर सांगितले.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब म्हणाले की हा प्रश्न फक्त मराठा समाजाचाच नसून जात व्हेरिफिकेशन हे सर्वांसाठीच आहे. सर्वच जातींसाठी आहे. त्यामुळे हे मी गांभीर्याने घेत आहे आणि मी सोलापूर येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पाठपुरावा करण्यास सांगेन व त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊन स्वतः यामध्ये लक्ष घालेन असेही त्यांनी सांगितले व यावेळी बोलताना म्हणाले की करमाळा मध्ये जात पडताळणी ऑफिस संदर्भामध्ये आंदोलन झाले होते त्या ठिकाणी सुद्धा काही जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत असेही मला समजले आहे असे ते म्हणताच सचिन काळे यांनी त्यांना सांगितले की त्यापैकी मी एक आहे. सपकाळ साहेबांनी हे ऐकताच सदर प्रकाराची गांभीर्याने घेऊन लगेच विचारपूस केली व आता काय त्रास होत आहे का असेही विचारणा केली. यावेळी सचिन काळे यांनी सांगितले नाही स्थानिक प्रशासन सहकार्य करत आहे.

त्यावेळी बोलताना शेळके साहेब म्हणाले अधिकाऱ्यांवर आता शासनाचा दबाव व अंकुश राहिलेला नाही हे सुद्धा सर्वांनी समजून घेतले पाहिजे. जात पडताळणी ऑफिस मध्ये जर आता इथून पुढच्या काळात त्रास झाला तर आमची सत्ता नाही परंतु, जन आंदोलन उभा करा आम्ही पूर्ण ताकदीनिशी निश्चित तुमच्या पाठीशी आहोत असे त्यांनी सांगितले अशी माहिती मराठा सेवा संघाचे अध्यक्ष व मराठा समन्वयक सचिन काळे यांनी दिली.

यावेळी सकल मुस्लिम समाजाचे अध्यक्ष जमीर भाई सय्यद, डॉक्टर अमोल दुरंदे, अँड. सविताताई शिंदे इं. उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे