Breaking
ब्रेकिंग

स्वेरी इंजीनियरिंग कॉलेज तर्फे संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान

0 7 9 9 5 4

स्वेरी इंजीनियरिंग कॉलेज तर्फे संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सन्मान

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

कुर्डूवाडी: दि. ०६/ कुर्डूवाडी येथील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ संचलित संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालया मधील एस.एस.सी परीक्षा 2026 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान स्वेरी इंजीनियरिंग कॉलेज पंढरपूर तर्फे करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. राजेंद्र दास, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. मगन सुरवसे, अध्यक्षस्थानी स्वेरी कॉलेज चे संस्थापक प्रा. डॉ. बी. पी. रोंगे इं. उपस्थित होते.

सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना मानाचा फेटा बांधून तसेच प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी माढा तालुक्यातील विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार टोणपे, संस्थेचे सचिव रोहन टोणपे, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. रोहित टोणपे, प्रशालेतील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 9 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे