करमाळा येथील कै. नामदेवराव जगताप न. प. उर्दू शाळेचा सलग दुसऱ्यांदा १०० टक्के निकाल

करमाळा येथील कै. नामदेवराव जगताप न. प. उर्दू शाळेचा सलग दुसऱ्यांदा १०० टक्के निकाल
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १२/ करमाळा येथील कै. नामदेवराव जगताप न. प. उर्दू शाळेचा सलग दुसऱ्यांदा १०० टक्के निकाल लागला आहे. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये करमाळा शहरातील कै. नामदेवराव जगताप न. प. उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
शाळेचा एकूण निकाल १०० टक्के लागला असून इकरा मजहर शेख या विद्यार्थिनींने ८२.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
द्वितीय क्रमांक शाहिस्ता सत्तार शेख ८१.२० टक्के तर
तृतीय क्रमांक जारा मुनाफ कुरेशी ७७.४० टक्के हिने पटकाविला आहे.
या यशाबद्दल नगराध्यक्षा मोहिनी सावंत, नगरसेवक संजय सावंत, नगरसेविका चैताली सावंत, नगरसेविका जबिन मुलाणी, नगरसेविका ज्योत्स्ना लुणिया, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर शेख यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक जुबेर जनवाडकर सर, जुबेर सय्यद सर, आरिफा मोमिन, कौसर हन्नुरे, निगार मुंडेवाडी, अफसाना बागवान, नाजिया मनूर, फरहाना पठाण, यास्मिन शेख, सनराईज कल्सासेसचे संस्थापक मुजावर सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.
गेल्या दोन वर्षापासून या शाळेला दहावीच्या परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन करत आहेत. त्याला विद्यार्थ्यांनीही उत्तम प्रतिसाद देऊन हे यश संपादित केले असल्याने या सर्वांचे कौतुक केले जात आहे.


