Breaking
ब्रेकिंग

महायुतीचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य निवडून द्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलू:- पालकमंत्री जयकुमार गोरे

0 7 6 9 4 3

महायुतीचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य निवडून द्या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलू:- पालकमंत्री जयकुमार गोरे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०३/ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची करमाळा येथील वीट जिल्हा परिषद गटामध्ये मौजे – वीट या ठिकाणी जाहीर प्रचार सभा संपन्न झाली. या प्रचार सभेमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मतदारांना आव्हान केले की तुम्ही भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या या तालुक्यात विकासापासून वंचित राहिलेल्या सर्व गावांना आम्ही ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी देऊ व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून दाखवू असे आव्हान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थित नागरिकांना केले.

या सभेसाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, भाजपा महिला आघाडीच्या रश्मीदिदी बागल, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, युवा नेते दिग्विजय बागल, विलासराव घुमरे, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व उमेदवार उपस्थित होते. या सभेसाठी वीट जिल्हा परिषद गटातील हजारो नागरिकांनी उपस्थिती दर्शवत मोठी गर्दी केली होती.

पालकमंत्री गोरे यांच्या सभेने वीट जिल्हा परिषद गट व तालुक्यात गणेश चिवटे यांच्या नावाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे