Breaking
ब्रेकिंग

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती विविध उपक्रमांनी साजरी

0 7 6 9 3 4

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती विविध उपक्रमांनी साजरी

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २३/ यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन व कार्य या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी प्रा. डॉ. धीरज पाचपिले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या भाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणादायी विचारांचा तरुण पिढीने अंगीकार करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने हे होते. त्यांनी नेताजींच्या राष्ट्रभक्ती, त्याग आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रुपाली थोरात यांनी केले व सूत्रसंचालन प्रा. डॉ. वंदना भाग्यवंत यांनी तर प्रा. हर्षद जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम सांस्कृतिक विभागाने आयोजित केला होता.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे