Breaking
ब्रेकिंग

सशक्त भारत अभियान चे प्रशिक्षक महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्काय एवेन्यू सोसायटी (बदलापूर) येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा

0 4 3 3 2 3

सशक्त भारत अभियान चे प्रशिक्षक महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली स्काय एवेन्यू सोसायटी (बदलापूर) येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २२/ सशक्त भारत अभियान चे प्रशिक्षक व नशा मुक्त भारत अभियान चे ब्रँड अँबेसेडर तसेच वनमाला बबनराव वैद्य बहुउद्देशीय फाउंडेशन चे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महेश वैद्य यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली स्काय एवेन्यू सोसायटी बदलापूर जिल्हा ठाणे येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना महेश वैद्य यांच्याकडून व्यायामाचे बेसिक ट्रेनिग चे धडे तसेच नशा मुक्त राहण्यासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.

एवेन्यू सोसायटीतील मुला मुलींनी तसेच प्रौढांनी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात व उत्साहात हजेरी लावली. जीवनात व्यायामाचे महत्त्व काय आहे तसेच श्वास आणि शरीराची हालचाल कशी झाली पाहिजे याबाबत मोलाचे मार्गदर्शन महेश वैद्य यांनी केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाचे महत्व आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होणे आणि जगभर मान्यता मिळणे ही आपल्या भारत देशासाठी गौरवाची बाब आहे. अनादी कालापासून योगा ही आपली संस्कृतीची ओळख राहिली आहे. योगामुळे आपल्याला होणारे फायदे शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन राखले जाते, शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी मदत होते, एकाग्रता वाढते, नित्य व्यायाम केल्याने शरीर निरोगी आणि सदृढ राहते असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे सचिव श्री प्रणय चव्हाण तसेच स्काय एवेन्यू सोसायटी चे सभासद श्री गजानन जाधव साहेब तसेच संदीप जी आचरेकर सर उपस्थित होते. त्यांनी योगा सेशन मध्ये भाग घेतला व सोसायटीमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत असे मत व्यक्त केले. आचरेकर सर तसेच सचिव श्री प्रणय चव्हाण यांनी सोसायटी च्या वतीने महेश वैद्य यांचे आभार मानले.

या कार्यक्रमास महिला प्रशिक्षिका यशश्री कुलकर्णी आवर्जून उपस्थित होत्या. आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यासाठी श्री गजानन जाधव साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आणि उपस्थित सर्वांचे महेश वैद्य यांनी आभार मानले. हा कार्यक्रम अतिशय खेळी मेळीच्या वातावरणात पार पडला.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे