Breaking
ब्रेकिंग

करमाळा येथे शुक्रवारी सकाळी 11-00 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा निघणार; आ. संग्राम (भैय्या) जगताप व आ. अमोलजी खताळ यांची प्रमुख उपस्थिती

0 7 6 9 4 3

करमाळा येथे शुक्रवारी सकाळी 11-00 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा निघणार; आ. संग्राम (भैय्या) जगताप व आ. अमोलजी खताळ यांची प्रमुख उपस्थिती

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. ०७/ शुक्रवार दिनांक 10/10/2025 रोजी हिंदू योद्धा आमदार संग्राम (भैय्या)जगताप व हिंदू योद्धा आमदार अमोलजी खताळ यांच्या प्रमुख उपस्थित करमाळा येथे सकाळी (11-00) अकरा वाजता हिंदू जन आक्रोश मोर्चा निघणार असून सर्व हिंदू बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान सकल हिंदू समाज करमाळा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की करमळा शहरातील मौललीचा माळ येथे ग्रामदैवत पूजना वेळी हिंदू वडार समाजावर काही समाजकंटक जिहादी लोकांनी बेदम मारहाण करून दगडफेक केली. त्यात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. याची फिर्याद देण्यास पोलीस स्टेशनला जखमी वडार समाजातील लोक गेले असता जिहादीच्या दबावापोटी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी फिर्याद घेण्यास नकार दिला.

पोलीस प्रशासनाच्या या भूमिके विरोधात व हिंदू वडार समाजातील अन्यायग्रस्त व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी लव्हजिहादीचे आक्रमण, जिहादीचे बेकायदेशीर अतिक्रमण, गोरक्ष प्रमुखावर होणारे हल्ले या सर्वांना आळा बसण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू योद्धा आमदार संग्राम (भैय्या) जगताप व हिंदू योद्धा आमदार अमोलजी खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ठीक 11-00 वाजता श्री देवीचा माळ येथून मोर्चा निघणार असून, छत्रपती चौक, सुभाष चौक या ठिकाणी सभा होईल. यामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान सखल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे