निसर्गाचे वरदान लाभलेल्या मांगी तलावा चे सौंदर्य हरवले काटेरी झुडपांच्या विळख्यात
निसर्गाचे वरदान लाभलेल्या मांगी तलावा चे सौंदर्य हरवले काटेरी झुडपांच्या विळख्यात
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. २६/ करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध असा मांगी तलाव यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्येच ओहोरफलो झालेला आहे. मांगी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तलावाच्या सांडव्यातून पाणी वहायाला सुरुवात झाली आहे. मांगी तलाव भरल्यानंतर दिसणारे विलोभनीय दृश्य व सांडव्यातून खळखळत वाहणारे पाण्याचे दृश्य हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी करमाळा तालुक्यासह आजूबाजूंच्या तालुक्यांमधील अनेक पर्यटक, निसर्गप्रेमी हे मांगी तलाव व परिसराला भेट देतात. परंतु मांगी तलाव परिसरात पोहोचण्यासाठी निसर्गप्रेमी पर्यटकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण मांगी तलावाकडे येणारे डाव्या व उजव्या कॅनल पट्टीवर प्रचंड प्रमाणात काटेरी झुडपे उगवलेली आहेत. त्यामुळे चार चाकी, दुचाकी वाहन घेऊन येणाऱ्या निसर्गप्रेमींना तलावाकडे येताना प्रचंड कसरत करावी लागत आहे.
तलावावरती जाण्यासाठी बांधलेल्या पायऱ्यांच्या आजूबाजूला प्रचंड काटेरी झुडपं उगवलेले असल्यामुळे आबाल, वृद्धांना तलावा वरती पोहोचताना प्रचंड त्रास होतो आहे. लोणावळ्या खंडाळ्यापेक्षाही मांगी तलावा वरील मावळत्या सूर्याचे सूर्यास्त (सन सेट) हे दृश्य अत्यंत सुंदर व विलोभिनीय दिसते, परंतु निसर्गाने लाभलेल्या मांगीतलावाच्या सौंदर्यमध्ये काटेरी झुडपांची मोठी अडचण ठरत आहे. तरी पाटबंधारे विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन मांगीतलाव परिसराची स्वच्छता करावी त्याचप्रमाणे मांगी तलावा कडे पोहोचण्यासाठी कॅनल पट्टीच्या रस्त्याची ही दुरुस्ती करावी जेणेकरून पर्यटकांना निसर्गप्रेमींना तलावापर्यंत पोहोचताना कोणतीही अडचण येणार नाही अशी मागणी मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रवीण अवचर यांचेसह निसर्गप्रेमी करत आहेत.
निसर्गाचे वरदान लाभलेला मांगी तलाव शंभर टक्के भरलेला आहे. ओहरफुल झालेले पाणी हे सांडव्याबाहेर पडलेले आहे. हे विलभनीय दृश्य पाहण्यासाठी बरेचसे पर्यटक मांगी तलावाला भेट देत आहेत. परंतु तलाव परिसराची दुरावस्था ही अतिशय दयनीय आहे. मांगीतलाव परिसर मोठमोठे काटेरी झुडपांनी वेढलेला असून तलावाकडे येणाऱ्या कॅनलपट्टीवरती ही प्रचंड प्रमाणात काटेरी झुडपे उगवलेले आहेत. मी आज सकाळी ही माहिती घेऊन पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केलेला आहे. त्यावेळी त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आलेला आहे. व लवकरात लवकर तलाव परिसरातील स्वच्छता करून घेऊ असे आश्वासन दिलेले आहे.
श्री सुजित तात्या बागल, मांगी ग्रामपंचायत सदस्य.



