सर्वांचे लाडके मित्र दिनेश भाऊ सोरटे यांचे दुःखद निधन; सश्रुनयनांनी मित्र परिवारांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
सर्वांचे लाडके मित्र दिनेश भाऊ सोरटे यांचे दुःखद निधन; सश्रुनयनांनी मित्र परिवारांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २१/ करमाळा येथील रहिवासी असलेले दिनेश सोरटे यांचे दि. १९/०७/२०२५ रोजी दुःखद निधन झाले. अतिशय मनमिळावू, सर्वांना सहकार्य करण्याची आवड, मितभाषी, माणुसकी जपणार मानुस हा आपल्या सर्वांना सोडून गेला अशी भावना सर्व मित्रांनी व्यक्त केली. त्यांच्या अंत्य दर्शनासाठी शेकडो लोकांनी आपल्या मित्राला साश्रू नयनांनी निरोप दिला सर्वांचे डोळे पाणावले.
त्यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पुतणे, बहिणी, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. ज्या वयात मुलांना वडिलांची गरज असते अशा वेळेस ते लाडका मुलगा पृथ्वीराज आणि पत्नी यांना सोडून निघून गेले. मुलास मित्रासारखे वागणारे सर्वांना हवे हवे से वाटणारे दिनेश भाऊ यांना सर्व मित्रांनी जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली वा वाहिली.
शोकाकुल मित्र परिवार:- महेश वैद्य, संजय अण्णा मोरे, अभिजीत कांबळे, किसन कांबळे सर, बाळासाहेब होशिंग, पत्रकार सूर्यकांत होनप तसेच राम परदेशी, लखन, नितीन परदेशी, दत्ता कांबळे, राजा जगताप, दत्ता भांडवलकर आदी मित्रवर्यानी शोक प्रकट केला.
दिनेश भाऊंचा सर्वात मोठा आणि चांगला गुण म्हणजे प्रचंड व्यायामाचे आवड आणि निर्व्यसनी या दोन्ही गोष्टीमुळे माझा आणि दिनेश भाऊंचा जवळचा संबंध आला. फिट इंडिया आणि ड्रग फ्री इंडिया कॅम्पिनिंग अभियानाला त्यांचा पाठिंबा होता सद्भभावना होत्या. दिनेश भाऊ हे अतिशय तळमणीने सहकार्य करणारे आणि माझ्या अभियानास मनापासून सहकार्य करणारे सुस्वभावी आपली भूमिका ठामपणे मांडणारे मित्र दिनेश भाऊ यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ईश्वर त्यांचा कुटुंबास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो – –
महेश वैद्य
(नशा मुक्त भारत अभियान चे ब्रँड ॲम्बेसेडर व सशक्त भारत अभियान चे प्रशिक्षक)



