Breaking
ब्रेकिंग

ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या सर्व शैक्षणिक सवलती आता मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू होणार:- प्रा. झोळ सर यांच्या मागणीला यश

0 7 9 9 5 4

ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या सर्व शैक्षणिक सवलती आता मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू होणार:- प्रा. झोळ सर यांच्या मागणीला यश

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०६/ इतर मागासवर्गीय प्रवर्गाला लागू असलेल्या शैक्षणिक सवलती मराठा प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लागू कराव्यात, असे निवेदन दिनांक 25/08/2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांनी दिले होते. त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयी सकारात्मकता दाखवून लवकरात लवकर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्यानंतर प्रा. झोळ सर यांनी वारंवार भेटी घेऊन पाठपुरावा केला होता.

आज इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जेवढ्या शैक्षणिक सवलती आहेत त्या सर्व शैक्षणिक सवलती आज पासून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू होणार असा शासन निर्णय पारित केला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील लाखो गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

प्रा. रामदास झोळ सर यांनीही हा शासन निर्णय काढल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. तसेच SEBC व OBC विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये जात पडताळणी सर्टिफिकेट सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ द्यावी यासंबंधीचा GR लवकरात लवकर काढावा. अशी विनंती प्रा. झोळ सर यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना केली होती. त्याचीही मंत्री महोदयांनी तात्काळ दखल घेऊन लगेच शासन निर्णय पारित केलेला आहे. त्या शासन निर्णयामुळे ही ज्या विद्यार्थ्यांची जात पडताळणी झालेली नाही अशा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. तसेच खुल्या (EWS)वर्गातील जैन, मारवाडी, ब्राह्मण, मुस्लिम व खुल्या प्रवर्गात मोडणाऱ्या इतर सर्व जातींसाठी सदरील सर्व शैक्षणिक सवलती लागू होण्यासाठी प्रयत्न करणार असेही प्रा. रामदास झोळ सर यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना प्रा. झोळ सर म्हणाले महाराष्ट्र राज्यामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात मराठा समाजाला सर्वात जास्त शैक्षणिक सवलती देणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणून श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा कायम उल्लेख होईल. माननीय मुख्यमंत्री साहेब व महायुती सरकारचे प्रा. रामदास झोळ सर यांनी खूप खूप आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 9 9 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे