भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना रोटरी क्लबच्या वतीने राज्यातील रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲपचे वाटप
भाई सथ्था नाईट हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना रोटरी क्लबच्या वतीने राज्यातील रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲपचे वाटप
प्रतिनिधी : आसावरी जैन
देशात शाळाबाह्य गरीब, होतकरू, गरजवंत विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा ही संकल्पना राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळेच्या माध्यमातून पुन्हा प्रवेशित होऊन आपला शैक्षणिक स्तर उंचावण्याचा अनेक विद्यार्थी प्रयत्न करत असतात
दिवसा अर्थार्जन रात्री ज्ञानार्जन या संकल्पनेनुसार हे विद्यार्थी आपले दैनंदिन कामकाज करत असतात अशा विद्यार्थ्यांना कुटुंबाच्या रहाटगाड्याला आर्थिक हातभार लावत असताना आपल्या गरजांकडे दुर्लक्ष करावे लागते किंवा होते अशा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी त्यांची गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ ठाणे, घोडबंदर रोड येथील युथ सर्विस डायरेक्टर संतोष आंबेकर व रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरइंग युथ अध्यक्ष संगीता चंद्रन यांनी राज्यातील पुढील रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयडियल स्टडी ॲपचे मोफत वाटप केले आहे. या स्टडी ॲपचा वापर करून विद्यार्थी आपल्या कामाच्या ठिकाणी देखील अभ्यास करू शकतील व त्यांची गुणवत्ता निश्चित वाढणार आहे .
आयडियल स्टडी ॲप भाई सथ्था नाईट हायस्कूल नियमित येणाऱ्या व गुणवत्ता सिद्ध करू शकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना देण्यात आली
अनेक मुलींचे कमी शिक्षण झालेले असतानाच विवाह होतात त्यानंतर त्यांना शिक्षणाची गरज भासते त्यावेळेस अशा महिलांसाठी /मुलींसाठी रात्रशाळा ही एकमेव संधी असते अशा विद्यार्थिनींना घरकाम व इतर रोजगार सांभाळून आपले शिक्षण पूर्ण करावे लागते अशा विद्यार्थिनींसाठी ही ॲप निश्चित उपयोगी ठरणार आहे असे मत भाई सथ्था नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे यांनी ऑनलाइन कार्यक्रमात हजेरी लावून व्यक्त केले व रोटरीअन डॉ. बिंदू शिरसाठ, श्रावणी आंबेकर, रेहाना शेख, अल्ताफ शेख,हर्ष माकोल, विनया हेब्बर, राजम अमासी, गौरव मालवीय यांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी गजेंद्र गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांसमवेत हजर राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.



