Breaking
ब्रेकिंग

मौजे बाभूळगाव येथे खेत बचाव अभियान संपन्न*

0 8 6 7 4 4

*मौजे बाभूळगाव येथे खेत बचाव अभियान संपन्न*

राहुरी तालुका जावेद शेख

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वित चारापिके संशोधन प्रकल्पाच्या वतीने खेत बचाव अभियान आणि संतुलित खत वापर जागरूकता अभियानांतर्गत दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी चारा पिकांचे तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम मौजे बाभूळगाव ता. राहुरी येथे संपन्न झाला. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांचे सूचनेनुसार व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वाखाली आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय समन्वित चारापिके संशोधन प्रकल्पाचे चारा पैदासकार डॉ. कैलास भोईटे होते. याप्रसंगी बाबुळगावचे सरपंच श्री. गोरख गिऱ्हे,चारापिके संशोधन प्रकल्पाचे वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. योगेश सैंदाणे, श्रीगणेश दूध डेअरीचे संचालक श्री. एकनाथ पाटोळे व वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. बी. जी. राठोड उपस्थित होते.
यावेळी डॉ. कैलास भोईटे आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले की मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय, जैविक व हिरवळीच्या खतांचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. यामुळे जमिनीचा कर्ब वाढून जमीन सुपीक होईल. याप्रसंगी झालेल्या तांत्रिक चर्चासत्रामध्ये डॉ. योगेश सैंदाणे यांनी चारा पिकांमध्ये जैविक कीटकनाशकांचा कशाप्रकारे वापर करावा व त्यामुळे पशूंचे आरोग्य कसे अबाधित ठेवता येईल याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. बी. जी. राठोड यांनी मातीची सुपीकता वाढविण्यासाठी जमिनीत काय काय उपाययोजना कराव्यात व मातीचा नमुना कशा प्रकारे घ्यावा याविषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. योगेश सैंदाणे यांनी केले. यावेळी त्यांनी कृषी तंत्रज्ञान घरोघरी, समृद्धी येईल गावोगावी या संकल्पनेतून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जात असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांनी संतुलित खत वापर जनजागृती अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चारापिके संशोधन प्रकल्पातील श्री. सुहास भालेराव, श्री. संदीप ढगे, श्री. संजय पवार, श्री. समर्थ दुबळे व श्री. अक्षय पवार यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी श्री. जालिंदर वाघमोडे, श्री. सुजित पाटोळे, श्री. अशोक पाटोळे, श्री. मच्छिंद्र वाघमोडे, श्री. अनिल थोरात तसेच बाभुळगाव, वरवंडी व खडकवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे