अफुच्या झाडाची बेकायदेशिर लागवड ?
अफुच्या झाडाची बेकायदेशिर लागवड ? मुद्देमालासह आरोपी शेवगाव पोलीसांनी केला गजाआड

अफुच्या झाडाची बेकायदेशिर लागवड ?
मुद्देमालासह आरोपी शेवगाव पोलीसांनी केला गजाआड
एस डब्ल्यू न्यूज / प्रतिनिधी
पोकाँ . शाम बाबासाहेब गुंजाळ नेमणुक- शेवगाव पोलीस स्टेशन ता. शेवगाव जि. अहिल्यानगर यांचे खबरीवरुन शेवगांव पोलीस स्टेशन गु.र.नं. १४८/२०२५ रोजी आरोपी गणेश नवनाथ घोरतळे ( वय २२ ) रा. मारुती वस्ती बोधेगाव ता. शेवगाव यांचे विरुध्द एन डी पी एस अधिनियम १९८५ चे कलम ८(b), १८ प्रमाणे दि .२५/०२/२०२५ रोजी २३/४५ वा चे सुमारास शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेले अफुच्या झाडाची बोधेगाव शिवारात ईसम गणेश नवनाथ घोरतळे यांनी त्यांचे शेतामध्ये बेकायदेशिररित्या लागवड केली असल्याचे गुप्त बातमीदारामार्फत माहीती पोनि समाधान नागरे यांना मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच पंचासह जावुन छापा टाकला असता गणेश नवनाथ घोरतळे याचे मालकीची गट नं. ४५१ मध्ये अंदाजे चार गुंठे क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेले अफूच्या झाडाची बेकायदेशिररित्या लागवड केली असल्याचे मिळून आल्याने सदर मुद्देमालाचा जागीच पंचनामा करुन त्यामध्ये अफूची चो ९५३ लहान मोठी झाडे त्यास बोंडे असलेली वजन ३९.६८५ किलो असुन त्याची किंमत अंदाजे ११,४३,६००/-असा मुद्देमाल मिळून आला आहे.
दि . २५/०२/२०२५ रोजी १५/०० वा चे सुमारास बोधेगाव ता. शेवगाव शिवारातील शेती गट ४५१ मध्ये ईसम गणेश नवनाथ घोरतळे ( वय २२ ) हा त्याचे मालकीचे शेतात वरिल वर्णनाचा आणि किंमतीचा महाराष्ट्र राज्यात शासनाने लागवडीस बंदी घातलेल्या अफुच्या झाडाची बेकायदेशिररित्या लागवड करुन वाढविलेल्या स्थितीत मिळुन आली त्याचेवर पोकों ०३ शाम बाबासाहेब गुंजाळ नेमणूक शेवगाव पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरुन एन डी पी एस कायदा सन १९८५ ते कलम ८(b), १८ प्रमाणे कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर ईसमास गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे अहिल्यानगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान नागरे, सपोनि धरमसिंग सुंदरडे, सपोनि अशोक काटे, पोहेकों / चंद्रकांत कुसारे, पोहेकी किशोर काळे, पोकों शाम गुंजाळ, पोकों संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर, पोकाँ भगवान सानप, पोकाँ प्रशांत आंधळे, पोका एकनाथ गर्कळ, पोकाँ संपत खेडकर, मपोकाँ प्रियंका निजवे तसेच सायबर पोलीस स्टेशन अहिल्यानगर येथील पोकाँ राहुल गुड्डु,पोकॉ/नितीन शिंदे यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास सहा पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे शेवगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत.