Breaking
ब्रेकिंग

36 गावांसह करमाळा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला एक वेळ संधी द्या:- प्रा. रामदास झोळसर

0 3 9 0 8 3

36 गावांसह करमाळा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मला एक वेळ संधी द्या:- प्रा. रामदास झोळसर

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १२/ करमाळा माढा मतदारसंघांमध्ये रस्ते, वीज, पाणी याचबरोबर शिक्षण, आरोग्य, रोजगार निर्मिती करून कुर्डूवाडीसह ३६ गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक वेळ आमदार म्हणून निवडून सेवेची संधी द्यावी, असे मत करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. म्हैसगाव ता. माढा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेतकरी कामगार संघर्ष सेनेचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, अनुरथ झोळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अजिनाथ बापू परबत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा तालुकाध्यक्ष सत्यवान गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, जिल्हा संघटक सिध्देश्वर घुगे, तालुका उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, बापु गायकवाड, चंद्रशेखर जगताप सर, श्रीकांत साखरे पाटील, मेजर दत्तात्रय पंडित, प्रशांत नाईकनवरे, तुकाराम गवळी, तुकाराम खाटमोडे, हनुमंत गवळी, हनुमंत साबळे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की बेंदऒढ्याचा प्रश्न सोडवला नाही तर मी निवडणूक लढवणार नाही असे विद्यमान लोकप्रतिनिधी म्हणाले होते. आमच्याकडे सुत गिरणी काढतो म्हणाले ते पण झाले नाही. बेंद वड्यामुळे १४ गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवला असता. मला निवडून दिल्यास तो प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्तीस गावांमधील रस्ते पाण्याबाबत प्रश्न वर्षानुवर्ष तसेच आहे. तो प्रश्न मार्गी लावणार आहे. कुर्डूवाडी शहरामध्ये जागा मिळाल्यास शिक्षण संकुलाची निर्मिती करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय करणार आहे. आरोग्याच्याबाबतही सर्व सुविधा युक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्याचा मानस आहे. नोकरी महोत्सवाचे आयोजन करून युवकांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळून देणार आहे. करमाळा तालुक्यामध्ये सर्वात जास्त निधी दिला असे विद्यमान आमदार म्हणत आहेत आणि इकडे ३६ गावांमध्ये आल्यानंतर येथे सर्वाधिक निधी दिला असे सांगत आहेत. मग निधी गेला कुठे? हा प्रश्न जनतेने विचारणे गरजेचे आहे. करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळून देण्याबरोबरच मकाई, कमलाई, भैरवनाथ, विठ्ठल शुगर्स या साखर कारखान्याकडे अडकलेली बिले आंदोलन करून आम्ही मिळवून दिली आहेत. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सर्व घटकांना बहुजन बांधवांना न्याय देण्यासाठी आपण पाठपुरावा करून मुलींचे शिक्षण मोफत करण्याबरोबरच ओबीसी विद्यार्थ्यांनाही इतर समाजाप्रमाणे वस्तीगृह भत्ता मिळून दिला आहे. धनगर समाजालाही एसटी आरक्षणाप्रमाणे सर्व लाभ मिळवून देण्याचे काम केले. शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे त्यासाठी ‌‍पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुर्डूवाडी शहरामध्ये व्यावसायिक शिक्षणाची सोय करून एमआयडीसी उद्योग व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न करून स्वयंरोजगार मिळून देणार असल्याने कुर्डूवाडी शहर व ३६ गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ आमदार म्हणून निवडून ‍देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन प्रा. रामदास झोळ सर यांनी केले आहे.

*यावेळी मनोगत व्यक्त करताना शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की, या निवडणुकीत उभा असलेल्या चार उमेदवारांचा अभ्यास करा. प्रत्येकाला आपण संधी दिली आहे .एक वेळ या माणसाला संधी द्या. या प्रस्थापित उमेदवाराला त्याचा गट तट सांभाळायचा असुन, आपला वारसा टिकवण्यासाठी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. तुमच्या मुला मुलींच्या उज्वल भविष्यासाठी रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विकासाचा दृष्टिकोन असलेले उच्चशिक्षित, सुसंस्कृत अभ्यासू प्रामाणिक सामाजिक भान असलेल्या प्रा.रामदास झोळ सर यांना कुर्डूवाडी शहरासह छत्तीस गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रा. रामदास झोळ सरांना निवडून देण्याचे आवाहन दशरथ आण्णा कांबळे यांनी केले.*

यावेळी शेतकरी युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी प्रा. रामदास झोळ सर यांचे काम नक्कीच प्रेरणादायी असल्याने आम्ही कुर्डूवाडी 36 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना पाठिंबा दिला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना पुरूस्कृत केले आहे. एक सुशिक्षित, अभ्यासू, सुसंस्कत नेतृत्वाची विकासासाठी गरज असल्याने छत्तीस गावामधून त्यांना मताधिक्य मिळून घेऊन निवडून देणार असल्याचे त्यांनी सांगितले

या जाहीर सभेत गफूरभाई शेख तालुकाध्यक्ष काँग्रेस ओबीसी विभाग, भगवान डोंबाळे, तालुका संघटक तालुका उपाध्यक्ष आनंद भैय्या झोळ, संभाजी शिंदे तालुकाध्यक्ष पोलीस मित्र संघटना, संजय मामा शिंदे गटाचे करंजे गावातील शहाजी पवार, युवराज वीर, दिवेगव्हाण गावचे तालुका पश्चिम गट कोळी समाजाचे युवा नेतृत्व मिथुन आनंद मोरे, यांनी विधानसभा निवडणुकीसाठी प्रा. रामदास झोळ सर यांना पाठिंबा देऊन झोळ परिवारामध्ये प्रवेश केला आहे.

या जाहीर सभेत हलगी वाजवून प्रा. रामदास झोळ सर यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक श्रीकांत साखरे पाटील, यांनी केले तरआभार स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा संघटक सिद्धेश्वर घुगे यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे