Breaking
ब्रेकिंग

करमाळा येथील श्री देवीचा माळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0 7 6 9 5 1

करमाळा येथील श्री देवीचा माळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २४ /   करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री देवीचा माळ येथील श्रीमंत राजे राजे राव रंभा निंबाळकर यांच्या पदस्पर्शाने श्री देवीचा माळ पावन नगरीत श्रीमंत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव उत्साहाने पार पडला. यावेळी श्री देवीचा माळ येथील शिवजयंती उत्सव समिती सौरभ चव्हाण, रोहित चौधरी, विनायक भोसले, वैभव पवार, आदित्य पवार इत्यादींनी अतिशय नियोजनबद्ध शिस्तबद्ध शिवजयंती कार्यक्रम राबवून मिरवणुकीचे आयोजन केले.

यामध्ये वेगवेगळे बँड पथक व राजे राव रंभा तरुण मंडळ श्री देवीचा माळ येथील लेझीम पथक या मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते. त्याचप्रमाणे शिवजयंतीची मिरवणूक काढून शहरातील शिवछत्रपती चौक येथे छत्रपतींच्या शिवस्मारकाला भेट देऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.

श्री देवीचा माळ येथील शिवजयंती उत्सव मिरवणुकीचे उद्घाटन श्रीदेवीचा माळ येथील नूतन सरपंच संतोष भाऊ पवार व करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन ( मालक) गायकवाड, मराठा महासंघाचे अध्यक्ष सचिन जी काळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन भाऊ चोरमले, शिवसेना तालुका उपप्रमुख अंगद दादा बिडवे, माजी सरपंच श्रीराम आप्पा फलपले, प्रवीण हिरगुडे, प्रभाकर धोंडे पोलीस पाटील, मनोज जामदार, तुषार आबा जगताप, रोहित सोरटे, मनसेचे श्रीकांत चव्हाण यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित श्रीदेवीचा माळा येथील नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सर्व ग्रामस्थ व गावकऱ्यांनी सहभाग घेऊन मिरवणुकीची सांगता केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे