Breaking
ब्रेकिंग

संजय बाळासाहेब मुंगसे यांची महसूल सहाय्यक पदी निवड

आई वडिलांचे आणि भावाचे स्वप्न पूर्ण झाले - संजय मुंगसे

0 3 9 1 0 5

संजय बाळासाहेब मुंगसे यांची महसूल सहाय्यक पदी निवड

 आई वडिलांचे आणि भावाचे स्वप्न पूर्ण झाले – संजय मुंगसे

एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक पदी संजय बाळासाहेब मुंगसे यांची निवड झाली आहे . दक्ष पोलिस मित्र संस्थेचे अध्यक्ष शहादेव मुंगसे , ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, नमो फाऊंडेशन आणि एस डब्ल्यू न्यूजचे पदाधिकारी यांच्या वतीने संजय मुंगसे यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला . संजय मुंगसे हे बालाजी देडगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत .

संजय मुंगसे यांनी एस डब्ल्यू न्यूजशी बोलताना सांगितले की, मी बालाजी देडगाव या छोट्याशा खेडेगावातून अहिल्यानगर या शहरात येऊन २०१९ साली अभ्यासाला सुरुवात केली . सेल्फ स्टडी करून अभ्यास केला . खेडेगावातून आल्यामुळे सुरुवातीला खूप अडचणी आल्या पण खचून न जाता परिस्थितीला सामोरे गेलो. खूप वेळा अपयशाला सामोरे जावे लागले . तरीही तयारी करत राहिलो . दरम्यानच्या काळात लॉकडाऊन पडला . दोन-तीन वर्ष कोणतीही परीक्षा झाली नाही .तो काळ खूप कठीण होता . इथपर्यंतच्या प्रवासात मला माझ्या कुटुंबाने खूप खूप मोलाची साथ दिली भावाने खुप सहकार्य केले . स्पर्धा परीक्षेतील खूप चांगला मित्र परिवार लाभला त्यामुळे खूप फायदा झाला . दरम्यानच्या काळात दोन वेळा पीएसआय मुख्य परीक्षा, दोन वेळा कर सहाय्यक मुख्य परीक्षा, दोन वेळा मंत्रालय लिपिक मुख्य परीक्षा दिल्या . एकदा राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली खूप वेळा थोड्या थोड्या मार्काने राहिलो पण यावेळी महसूल सहाय्यक पदी निवड झाली . माझ्या आई वडिलांचे आणि भावाचे स्वप्न पूर्ण झाले.

एस डब्ल्यू न्यूज आणि टिम कडून संजय मुंगसे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .

5/5 - (3 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे