Breaking
ब्रेकिंग

पोलीस व जनतेतील नाते अधिक दृढ व्हावे : डॉ. उद्धव शिंदे

पोलीस रेझिंग डे निमित्त एसपी सोमनाथ घार्गे यांचा 'स्नेहबंध' तर्फे सन्मान

0 7 6 9 4 3

पोलीस व जनतेतील नाते अधिक दृढ व्हावे : डॉ. उद्धव शिंदे

पोलीस रेझिंग डे निमित्त एसपी सोमनाथ घार्गे यांचा ‘स्नेहबंध’ तर्फे सन्मान

अहिल्यानगर : पोलीस व जनता यांच्यातील नाते अधिक दृढ व्हावे, विश्वास वाढावा आणि कायद्याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले. २ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पोलीस स्थापना दिन (पोलीस रेझिंग डे) म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना पुस्तक भेट देऊन शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक (गृह) रविंद्र देशमुख, मुख्याध्यापक अनिल गायकवाड, चंद्रकांत डाके तसेच विद्यार्थी उपस्थित होते. पोलीस रेझिंग डे साजरा करण्यामागचा हेतू, या दिवसाचे महत्त्व, जनता व पोलीस यांच्यातील विश्वास आणि आपुलकी वाढावी, पोलिसांबाबत असलेली भीती कमी व्हावी तसेच पोलीस हे जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. यावेळी केशवराव गाडीलकर शाळेच्या विद्यार्थ्यांना गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, सध्याचे कायदे, सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असलेली फसवणूक तसेच अशा गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व विद्यार्थ्यांकरिता निबंध स्पर्धेचे आयोजन करून विजेत्या विद्यार्थांना पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे