Breaking
ब्रेकिंग

राहुरी पोलिसांच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती

0 7 6 9 4 2

*राहुरी पोलिसांच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती*

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील विविध पन्नास शाळांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी संवाद साधून अमली पदार्थ विरोधी जनजागृती केली .तसेच गणेगाव येथील वाणी महाविद्यालयातील सुमारे 350 विद्यार्थ्यांना अमली पदार्थ विरोधी जनजागृती करत मार्गदर्शन केले .
तसेच शिक्षण विभाग .पंचायत समिती यांच्या समन्वयातून तालुक्यातील सर्व शाळांमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृतीच्या दृष्टीने 1)निबंध स्पर्धा 2) चित्रकला स्पर्धा 3)जनजागृती रॅली
4) कलापथक द्वारे सादरीकरण
5 ) भित्ती पत्रके प्रदर्शन
आयोजित करून शालेय विद्यार्थ्यांमध्ये तसेच महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृतीची मोहीम दिनांक 16 आठ 2025 पर्यंत आयोजित केलेली आहे . सदर जनजागृती मोहिमेकरता पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री मोहिनीराज तुंबारे व त्यांचे सहकारी गुलदगड यांनी विशेष योगदान दिलेले आहे .

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घाडगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री देवदत्त पवार साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ , पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ ,गणेश वाघमारे ,राजू जाधव ,संदीप मुरकुटे पोलीस हवालदार अशोक शिंदे ,गणेश सानप करत आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे