Breaking
ब्रेकिंग

वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे मोठे नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी

0 8 6 7 0 3

वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे मोठे नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी

जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

जळगाव :- अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याबाबत आ. अनिल पाटील यांनी तहसीलदारांना आदेश दिले असून कृषी मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.तालुक्यात गेल्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याने या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अश्या सूचना माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

               यासंदर्भात आमदारांनी व राज्याचे कृषी मंत्री जिल्हाधिकाऱ्यांशी देखील भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. तालुक्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसात अवकाळी पावसाचा कहर पहायला मिळाला असून २ रोजी सायंकाळी झालेल्या पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरीराजा हवालदिल झाला आहे. अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिपळे खु, पिंपळे बु, अटाळे , शिरसाळे, आर्डी, अनोरे, जवखेडा यासह नीम, पाडळसरे, कळमसरे, बोहरा, माडळ, वावडे तासखेडा, आमोदे, अंतुर्ली, रंजाणे आदी बोरी काठावरील गावे यासह तालुक्यात सर्वदूर जोरदार वादळ आणि वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचा मका, बाजरी, ज्वारी, दादर, गहू व इतर पिके आडवी पड़ली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मका, गहू व इतर काढणीवर आलेली पिके कापून ठेवलेली असल्याने ती पिकेही पाण्याखाली आल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची माहिती आमदारांनी कृषिमत्र्यांना देऊन सदर पीडित शेतकरी बांधवाना शासनाने मदत घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे