जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब यांच्यातर्फे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पूरग्रस्तांना खाद्यपदार्थाचे चे वाटप
जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब यांच्यातर्फे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पूरग्रस्तांना खाद्यपदार्थाचे चे वाटप
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. १०/ जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ संचलित संजय मामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी व भोगेवाडी व रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी पुणे यांच्यावतीने नदीकाठच्या गावातील नागरिकांना संसार उपयोगी साहित्य, धान्य व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
मुंगशी, नाडी, शिंगेवाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे पुरामुळे शैक्षणिक नुकसान झाले होते. सामाजिक बांधिलकी म्हणून जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार टोणपे, संस्थेचे सचिव श्री रोहन टोणपे, संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. श्री रोहित टोणपे यांच्या संकल्पनेतून सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने व विद्यार्थ्यांच्या वतीने तसेच रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी यांच्याकडून शैक्षणिक साहित्य, तसेच पुराच्या पाण्यामुळे ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ (अं) मधील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्यातर्फे व विद्यार्थी पालक यांच्या मदतीतून घरगुती दैनंदिन वस्तूंचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद शाळा मुंगशी, नाडी व शिंगेवाडी या प्रशालेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी, विद्यार्थी, गावातील माता भगिनी व पुरुष मंडळी मोठ्या संख्येने, उपस्थित होते. या अस्मानी संकटातून या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य फुलवण्याचे काम निश्चितच झाल्याचे दिसून आले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक अभिनंदन होत आहे.



