राष्ट्रीय नानचाकू स्पर्धेत सोहम बिडगरने केली अनेक पदकांची कमाई
सोहमवर होत आहे कौतुकांचा वर्षाव

राष्ट्रीय नानचाकू स्पर्धेत सोहम बिडगरने केली अनेक पदकांची कमाई
सोहमवर होत आहे कौतुकांचा वर्षाव
एस डब्ल्यु न्यूज रिपोर्ट
चौथी राष्ट्रीय नानचाकू स्पर्धा 2026 ही नानचाकू असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दि 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान दादानगर कानपुर उत्तरप्रदेश येथे आयोजित करण्यात आली. यात अनेक राज्यांतून खेळाडूंनी सहभाग नोंदविला .

साकुर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील सोहम बाळासाहेब बिडगर वय 13 वर्षे याने काता प्रकारात रौप्य पदक, कुमते प्रकारात रौप्य पदक तर फ्री स्टाईल प्रकारात कांस्य पदक असे एकूण 3 पदक मिळविले. त्याला प्रशिक्षक श्री . बाळासाहेब बिडगर यांनी मार्गदर्शन केले.महाराष्ट्र नान चाकू असोसिएशन चे सेक्रेटरी श्री दीपक शिर्के यांनी सोहमचे अभिनंदन केले.
सोहम हा आदर्श इंग्लिश मिडीयम स्कुल खडकवाडी तालुका पारनेर येथे इयत्ता 7 वी च्या वर्गात शिकत आहे. सोहम याने यापूर्वी सन 2025 मध्ये तालुकास्तरीय शालेय त्वायकांदो स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले असून वाडिया पार्क अहिल्यानगर येथे जिल्हा स्तरीय शालेय स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे. 2024 मध्ये कानपुर येथे भरलेल्या 3 री राष्ट्रीय नानचाकू स्पर्धेत 12 वर्षे वयोगटा खाली रौप्य पदक मिळविलेले होते. सन 2025 मध्ये तायक्यांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आयोजित केलेल्या 5 वी राज्य स्तरीय तायक्यांदो स्पर्धेत सोहम ने कांस्य पदक मिळविलेले आहे.
सर्व सामाजिक राजकिय स्तरातून अनेक मान्यवरांकडून सोहमच्या या यशाचे कौतुक होत आहे .



