भुसावळ बसस्थानकाची पावसाने केली दुर्दशा
भुसावळ बसस्थानकाची पावसाने केली दुर्दशा
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
भुसावळ :- भुसावळ शहर हे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून येत्या काळात जिल्हा होणार आहे.दोन लाख वस्तीचे हे शहर आहे.तालुक्याचे शहर असल्याने परिसरातील ग्रामीण भागातील जनता येथूनच प्रवास करतात.त्यामुळे या बसस्थानकावर कायम गर्दी असते.महामंडळाला ही आर्थिक मदत होते.परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या बसस्थानकावर पावसाळ्यात ही हलाखीची परिस्थिती येते आणि प्रवाशांना बसस्थानकात उभे रहायला सुद्धा जागा नसते.संपूर्ण मैदान पाण्याने भरून तलाव तयार होऊन जातो.
दरवर्षी फोटो, बातम्या, निवेदने दिली जातात. परंतु महामंडळाला घाम फुटत नाही.वरिष्ठ अधिकारी काही ही लक्ष देत नाही.शिवसेना ठाकरे पक्षाने वेळोवेळी मागणी केली.पण मुरूम ,गिट्टी टाकून वेळ मारून नेली होती.
आता पुन्हा पावसाने तेच हाल केले आहेत.मात्र दरवर्षी प्रमाणे महामंडळ शांत आहे.लोकप्रतिनीधी काही ही पहायला तयार नाही.नागरिक शांत आहेत.!
या शहराला परिवहनमंत्री पद …. मुख्यमंत्री पद मिळाले तरी असेच हाल राहतील अशी परिस्थिती दिसत आहे.
पाहुया… महामंडळ काय ,कधी दुरूस्ती करणार. ?



