सोशल मीडियाकडे होत असलेले आकर्षण लहान मुलांकरिता धोकादायक – ह. भ.प.श्री शिवाजी महाराज मचाले

सोशल मीडियाकडे होत असलेले आकर्षण लहान मुलांकरिता धोकादायक – ह. भ.प.श्री शिवाजी महाराज मचाले
श्रीगोंदा प्रतिनिधी – आदेश उबाळे
श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील ग्रामदैवत श्री बोडखेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर सालाबादप्रमाणे गेल्या ३४ वर्षांपासून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अति उत्सवात साजरा होत असतो. याच पार्श्वभूमीवर याही वर्षी (वर्ष ३५वे) अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करत कीर्तन- प्रवचन -भजन श्रवनाचा आस्वाद आनंद घेत आहेत.
आपल्या मराठी भाषेचा अभिमान असावा.
लहान मुलांचा सोशल मीडियाकडे होत असलेले आकर्षण किंवा कल लहान मुलांकरिता धोकादायक आहे आई – वडिलांचा सांभाळ करणं मुलांचा धर्म आहे तर मुलांवर संस्कार करणं आई -वडिलांचे कर्तव्य असे तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनरुपी सेवेमध्ये समाजप्रबोधन करताना ह. भ.प.श्री शिवाजी महाराज मचाले यांनी केले आहे.
गुरुवार दि. २७/०२/ २०२५ रोजी सकाळी ९ ते ११ वा या वेळेत ह. भ.प.श्री पुंडलिक महाराज नागवडे ( न्हावरा ) याचे काल्याचे कीर्तन होईल कीर्तन श्रवनाचा आस्वाद घेण्याचे आवाहन ग्रामस्थ शिरसगाव बोडखा व श्री बोडखेश्वर भजनी मंडळाकडून होत आहे.