Breaking
ब्रेकिंग

लोकांच्या जीवाची किंमत अवघे वीस रुपये?

माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून घेतली दखल

0 8 6 7 0 8

लोकांच्या जीवाची किंमत अवघे वीस रुपये?

माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून घेतली दखल

राहुरी तालुका जावेद शेख

मनमाड हायवेवर खड्ड्यांनी उघडलेले मृत्यूचे दरवाजे… फक्त एका आठवड्यात ६ निरपराध नागरिकांचे प्राण गेले. आम्ही मोठ्या आंदोलनातून आवाज उठवला, तेव्हा प्रशासनाने “अवजड वाहनांचे डायव्हर्जन करू” अशी ग्वाही दिली. पण नेहमीप्रमाणे आश्वासन फोल ठरले!

आज पुन्हा अवजड वाहने रस्त्यावरून धावत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे फक्त ५०० रुपयांची किंवा २० रुपयांची लाच घेऊन ही जीवघेणी वाहने हायवेवर सोडली जात आहेत. हे खुद्द ट्रक ड्रायव्हरनेच कबूल केले आहे. अहो, एवढी नीच पातळी? लोकांच्या जीवाचं मोल इतकं स्वस्त?

लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. अजून किती बळी घेणार? लोकांच्या जीवांची जबाबदारी कोण घेणार यापुढे जर एखाद्या नागरिकाचा जीव गेला, तर त्याला पूर्णपणे पोलिस प्रशासन जबाबदार असेल. आम्ही एसपींना इशारा दिला आहे, तात्काळ अवजड वाहनं बंद करा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलनाची परिसीमा दाखवू!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे