Breaking
ब्रेकिंग

लाडक्या महिलांचे टू व्हीलर मोफत प्रशिक्षण उपक्रमास सुरुवात

0 3 9 0 5 4

लाडक्या महिलांचे टू व्हीलर मोफत प्रशिक्षण उपक्रमास सुरुवात

सि वाय डी ए संस्थेचा उल्लेखनीय उपक्रम

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

अहिल्यानगर शहरातील पहिले लाडक्या महिलांचे टू व्हीलर चे मोफत प्रशिक्षण युनिक इन्स्टिटय़ूट ॲण्ड ट्रेनिंग सेंटर च्या सौजन्याने सि वाय डी ए संस्थेमार्फत दि . २० मार्च रोजी नालेगाव येथील विनायक हिरो होंडा सर्व्हिसिंग सेंटर येथे उत्साहात सुरवात झाली आहे. यावेळी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .

 सी वाय डी ए इंडिया फाउंडेशन तर्फे महिला सबलीकरण प्रकल्पांतर्गत मोफत महिलांना टू व्हीलर दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. संस्थेने आत्तापर्यंत अहिल्यानगर शहरांमध्ये 200 महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. अहिल्यानगर शहरांमधील गरीब होतकरू निराधार गर्जवंत महिलांना सुवर्णसंधी सीवायडीए तर्फे देण्यात येत आहे. संस्था महिलांच्या मध्ये जनजागृती करून स्वतःच्या पायावरती उभा करण्यासाठी परिश्रम घेत आहे. हजारो महिला संस्थेबरोबर जोडले जात आहेत प्रशिक्षणाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. च्या कोणी गरजू महिला असतील त्यांना आवाहन करण्यात येत आहे त्यांनी संस्थेशी संपर्क साधून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा .

श्री मोहन कांडेकर स्किल सेंटर हेड अहिल्यानगर
मो . नं . 7798072322

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे