निर्मलनगर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
निर्मलनगर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
एस डब्ल्यू न्यूज रिपोर्ट
नगर : नगर येथील सावेडी उपनगरात प्रभाग क्र.२ निर्मलनगर गाडेकर चौक येथे नगरसेवक मा .निखिलजी वारे यांच्या हस्ते झेंडा फडकावून ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . मा .नगरसेवक निखिलजी वारे यांच्या हस्ते ध्वज फडकावून झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रगीत घेण्यात आले . राष्ट्रध्वजास उपस्थितांकडून मानवंदना देण्यात आली .

अनेक शुर वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन भारत देश स्वतंत्र केला आहे आणि म्हणूनच आपण आज ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करत असल्याचे श्री . निखिलजी वारे यांनी सांगितले .
यावेळी बंटी हिवाळे,अभिषेक खामकर, सागर गवळी , पत्रकार वाघमोडे , डॉ . ताजवे यांनी देशभक्तीपर भाषण करून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सामाजिक संदेश दिला .
यावेळी वारे यांचा नगरसेवक पदी निवडून आल्याबद्दल महिला व नागरिकांनीच्या वतीने सत्कार करण्यात आला .

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुलांना व परिसरातील नागरिकांना बिस्कीट पुडे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले . विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले .
यावेळी नितीन थोरात ,संभाजी गवळी, इरफान शेख , ज्ञानदेव काळे, हिवाळे अंकल,चंद्रकांत वायकर, सामाजिक कार्यकर्ते सागर गवळी , जावेद इनामदार, साजिद इनामदार , सचिन अकोलकर, दिलीप ठाकूर , अभिषेक खामकर तसेच मेरी खंडागळे ,रंजना काळे , पुष्पा वायकर ,वर्षा गवळी आदी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .



