गुंडेगावला पावसाने झोडपलं,रात्रभर दमदार पाऊस, रस्त्यात गुडघाभर पाणी, अनेकांचे पिके उद्ध्वस्त…
तूर, कपाशी, उडीद, मुग, मका, कांदा, पिकांचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान....
गुंडेगावला पावसाने झोडपलं,रात्रभर दमदार पाऊस, रस्त्यात गुडघाभर पाणी, अनेकांचे पिके उद्ध्वस्त…
तूर, कपाशी, उडीद, मुग, मका, कांदा, पिकांचे मोठ्या प्रमाणात झाले नुकसान….
वाळकी / प्रतिनिधी : दादा आगळे
नगर तालुक्यातील गुंडेगाव सह परिसरात दमदार पावसाने झोडपून काढले असुन रविवारी मध्यरात्री पावसाची रिपरिप सुरू झाली ती सोमवारी ही सुरुच पहायला मिळाली. अचानकपणे झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी,व्यावसायिक, विद्यार्थी यांची तारांबळ उडाली.हराळमळा,कुताळमळा,धावडेवाडी चौधरवाडी आदी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक शेतामध्ये पाणी शिरले आहे.शेत परीसरात पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे.
तसेच ओढे तुडुंब भरून वाहू लागले असून गावाचा काही काळ संपर्क तुटला आहे.तसेच तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने ओढ्यावरून पाणी वाहू लागले आहे.यावेळी नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना सोशल मिडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.झालेल्या पावसामुळे विशेषतः शेती पिकांचे आणि जमिनीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. सततच्या पावसामुळे बाजरी,कपाशी,उडीद,कांदा,तुर,मुग,मका,फळफळावळ यांसारखे पिके शेतातच कुजून नुकसान झाले आहे.तसेच पाण्याचा साठा वाढल्याने मातीचे निसारण,पूर येणे किंवा वाहतूक रस्त्यांचे नुकसान झाले आहे.डोहाचे पाणी शेतात साठल्याने खरिप हंगाम अपयशी झाला आहे.
यावेळी गुंडेगाव भागात जोमदार पाऊस आणि पुराचा धोका असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा प्रशासन बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.पुढील दोन-तीन तास पावसाचा जोर असल्याने पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा बंद ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सुचना केल्या आहेत..
गुंडेगाव डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग कुताळमळा,गुंडेगाव मुख्य तलाव येथील पाझर तलावात येत असून या पूर्वीच तलाव भरून ओव्हरफ्लो झालेला आहे. सांडव्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सुरू असून क्षमतेपेक्षा जास्त पावसाचे पाणी आल्यामुळे अनेक शेतात पाणी शिरले, रस्ते खराब झाले, जास्तीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्याचे कपाशी,तुर, उडीद, कांदा पिके सध्या पाण्यात आहेत, पुढील दोन तीन दिवस जर असाच पाऊस सुरू राहिला तर शेतातील पिके सडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.तसेच मागिल पावसामुळे अगोदरच शेत हे पाण्यामध्ये असल्यामुळे कुठलेही उत्पन्न शेतकऱ्यांना घेता आले नाही त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांसह या शेतकऱ्याच्या शेतांचा पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
काल पासून झालेल्या पावसाने सोयाबीन, मग, कापूस, तूर यासारख्या अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाने पडलेल्या पाण्याचे निचरा न झाल्याने उभे पिकं उध्वस्त झाली आहेत.तर शेतात पाणी,चिखलाचे साम्राज्य झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये चिंता आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून आर्थिक मदतीचा निर्णय लवकरात लवकर घेण्याची गरज असून, यामधून शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी विशेष पॅकेज शासनाने शेतकऱ्यांना द्यावे.
रामकृष्ण कुताळ – गुंडेगाव, शेतकरी
………………………..
डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने धावडे वाडी शेत तसेच येथील पाझर तलावात पाणी मोठ्या प्रमाणात येत असून या पूर्वीच तलाव भरून ओव्हरफ्लो झालेला आहे.
दक्षिण भागासह परिसरात पावसाच्या पाण्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशा पिकांचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.अंबादास धावडे – शेतकरी, गुंडेगाव



