Breaking
ब्रेकिंग

फार्मसी महाविद्यालयात जागतिक योगा दिनाचे आयोजन

0 4 3 3 7 3

फार्मसी महाविद्यालयात जागतिक योगा दिनाचे आयोजन

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- खान्देश शिक्षण मंडळ संचलित स्व. पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डी.फार्मसी आणि स्व. प्रा. आर. के. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर या महाविद्यालयात ११ व्या जागतिक योगा दिनानिमित्त भारताचे माननीय  पंतप्रधान श्री. नरेंद्र जी मोदी साहेब  यांच्या आवाहनानुसार दि.२१ जून २०२५ रोजी सकाळी ६.३० ते ७.४५ या वेळेत  योग संगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
           या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खान्देश शिक्षण मंडळाचे सचिव प्रा.पराग पाटील सर प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन सर म, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र स. सोनवणे सर,  एन.सी.सी. कर्नल  अमित साहेब व जिमखाना प्रमुख डॉ. संदीप नेरकर सर  उपस्थित होते.

 या कार्यक्रमात प्रा.अर्चना पाटील यांचे योग विषयावर मार्गदर्शन तसेच राष्ट्रीय खेळाडू हर्षदा पाटील यांनी विविध योगासन प्रात्यक्षिक योग करून दाखवले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन प्रा.देवेश भावसार यांनी केले,  सूत्रसंचालन प्रा.अमृत अग्रवाल यांनी केले तसेच प्रा.अनिल बोरसे , प्रा.प्रफूल्ल चव्हाण, प्रा.सतिष ब्राह्मणे, अनिल महाजन, यश शिंपी व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.
             सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डाॅ.संदेश बी. गुजराथी फार्मसी विभागाचे चेअरमन मा.योगेशजी मुंदडे,खा.शि.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पी. पाटील,  प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र सोनवणे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे