Breaking
ब्रेकिंग

शेतकरी संघटनेच्या 26 कार्यकर्ते यांची निर्दोष मुक्तता

0 8 6 5 4 0

शेतकरी संघटनेच्या 26 कार्यकर्ते यांची निर्दोष मुक्तता

राहुरी तालुका /  प्रतिनिधी : जावेद शेख

शेतकरी संघटनेच्या वतीने १२ डिसेंबर २०१० रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी ऊसाला पहीली उच्चल २१०० रुपये प्रती टन मिळावी यासाठी राहुरी येथे नदीच्या पुलावर नगर मनमाड रोडवर सुमारे तीन तास रास्ता रोको आंदोलन केले हे आंदोलन शांततेत चालू होते अनेक मान्यवर यांनी ऊसाला पहीली उचल २१०० रूपये देता येती याची सविस्तर अभ्यास पूर्ण आपल्या भाषणात सांगितले काहीही प्रकार न घडता विनाकारण साखर सम्राट यांनी पोलिस बळाचा वापर करून शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या वर खोटे गुन्हे दाखल केले होते याचा निकाल न्यायालयाने खऱ्या अर्थाने दिला असल्याचे जिल्हा ऊस उत्पादक आंदोलन प्रमुख दिलीपराव इंगळे यांनी म्हटले आहे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहुरी कोर्टात 12 वर्ष व जिल्हा कोर्टात 3 वर्ष असे १५ वर्ष तारखेला हजर राहून राहुरी कोर्टात अँड. मोहनराव धोंडीराम पवार व जिल्हा कोर्टात त्यांचे चिरंजीव अँड. वैभव पवार यांनी विनामूल्य केस चालवली व ३० अक्टोंबर २०२५ रोजी अहमदनगर जिल्हा प्रथम श्रेणी न्यायमूर्ती श्री मोरे साहेब यांनी सदर दाव्यातील 26 आंदोलक यांची निर्दोष मुक्तता केली आहे उर्वरित आंदोलक यांचेवरील खटला प्रलंबित असून शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अँड.
वैभव मोहनराव पवार व त्यांचे सहकारी यांचा सत्कार करून सर्व शेतकरी बांधवानी अभिनंदन केले आहे शेतकऱ्याचे प्रश्नासंदर्भात यापुढेही काम चालूच राहणार असलेचे भावना यावेळी सर्व शेतकरी् बंधवानी व्यक्त केली आहे .

1/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे