महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति अवमानकारक लिखाण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई होणे बाबत पोलिस अधीक्षकांना निवेदन*
*महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति अवमानकारक लिखाण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई होणे बाबत पोलिस अधीक्षकांना निवेदन*
*महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक लिखाण करणाऱ्या व्यक्तीचा प्रथम अखिल भारतीय वाल्मिक समाज संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येते आहे*
नगर / प्रतिनिधी
अहिल्यानगर – महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक लिखाण करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला जे संविधान दिले त्यामुळे आज भारतातील सर्व जाती धर्मातील नागरीक सुरक्षित आहे तसेच त्यांना त्यांचे मुलभूत अधिकार दिले म्हणून त्यांचे आज या देशावर खूप मोठे उपकार आहेत हे कोणत्याही समाजाच्या नागरिक कधीही विसरू शकत नाही अहिल्यानगर शहर येथील माळीवाडा या ठिकाणी फरीद सुलेमान खान रा.भिंगार या आरोपीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल एका कागदावर अवमानकारक लिखाण करुन एका पिशवीत भरून फेकले हा प्रकार खुपच निंदनीय आहे. फरीद सुलेमान खान या समाजकंटकांनी जे कृत्य केले ते माफिचा लायकीचा नाही म्हणून सदर आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.भविष्यात शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना होऊ नये या करीता १) नगर शहरात असलेले प्रत्येक महापुरुषांच्या पुतळ्या समोर सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत .२) महापुरुषांच्या पुतळ्यांना कायम स्वरुपी पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन द्वारे करण्यात आली निवेदनावर गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर संघटनेच्या निवेदनावर दखल घेण्यात यावी संघटनेचे मागणी पूर्ण न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन आज अखिल भारतीय वाल्मिक समाज संघटनेच्या वतीने अहिल्यानगर पोलिस अधीक्षक कार्यालय येथील पोलिस उपविभागीय अधिकारी मा.टिपरसे साहेब यांना देण्यात आले या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,जिल्हासचिव अर्जुन जी चव्हाण,प्रहार सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद भाऊ परदेशी,अ.भा.वा.समाज संघटनेचे नगर शहराध्यक्ष रोहन चावरे,फुले शाहू आंबेडकर कलाम सामाजिक विचार मंच प्रदेशाध्यक्ष गणेश ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते राजु चव्हाण,विक्की करोलिया, गोविंद घोडके,ऋषभ झाजोंट,प्रकाश भाऊ,कीशोर उबाळे आदी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



