Breaking
ब्रेकिंग

जनसंपर्काभिमुख नेतृत्वाने छावणी परिषदेचा विकास वेग घेईल – डॉ. उद्धव शिंदे

छावणी परिषदेच्या नूतन सीईओ पल्लवी विजयवंशी यांचा ‘स्नेहबंध' तर्फे सन्मान.

0 7 6 9 4 3

जनसंपर्काभिमुख नेतृत्वाने छावणी परिषदेचा विकास वेग घेईल – डॉ. उद्धव शिंदे

छावणी परिषदेच्या नूतन सीईओ पल्लवी विजयवंशी यांचा ‘स्नेहबंध’ तर्फे सन्मान. .

प्रतिनिधी :   संवेद वायकर

अहिल्यानगर – “छावणी परिषदेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक, पारदर्शक आणि जनसंपर्काभिमुख नेतृत्वाची गरज आहे. पल्लवी मॅडम यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच अहिल्यानगरमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू होईल, असे प्रतिपादन सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
छावणी परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांचा ‘स्नेहबंध सोशल फौंडेशन’ तर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी रोप देऊन सन्मान केला. या सन्मान सोहळ्यावेळी कार्यक्रमास सीईओ विक्रांत मोरे, इतिहास संशोधक भूषण देशमुख, कार्यालय अधीक्षक स्नेहा पारनाईक, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक रमेश साके, स्वच्छता निरीक्षक गणेश भोर, तसेच कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल प्रमुख डॉ. गीतांजली पवार उपस्थित होते.
पल्लवी विजयवंशी या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी तालुक्यातील भुरसोडोंगरी येथील रहिवासी असून, त्यांनी केंद्र शासनाच्या यूपीएससी परीक्षेत देशात ७३० वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी प्रथम सिकंदराबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे कार्यभार सांभाळला होता. आता त्या अहिल्यानगर छावणी परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत.
या प्रसंगी स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी ‘स्नेहबंध’ संस्थेच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक संजय शिंदे, सूत्रसंचालन महेश भगत व आभार रमेश साके यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी पल्लवी विजयवंशी यांच्या कार्यशैलीबद्दल आणि त्यांच्यातील सकारात्मक नेतृत्वगुणांबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे