शिक्षिकेला निरोप देताना विद्यार्थीच नव्हे,संपूर्ण पालक रडले..
शिक्षिका स्वाती गोरे यांचा विद्यार्थ्यांना दिला मोलाचा संदेश..
शिक्षिकेला निरोप देताना विद्यार्थीच नव्हे,संपूर्ण पालक रडले..
शिक्षिका स्वाती गोरे यांचा विद्यार्थ्यांना दिला मोलाचा संदेश..
वाळकी प्रतिनिधी : दादा आगळे
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील रहिवासी तसेच कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील प्राथमिक शिक्षिका मुख्याध्यापिका स्वाती गोरे यांची नुकतीच बदली झाली यावेळी जाताना देण्यात येणारा निरोप एक भावनिक बंध जोडणारा जिव्हाळा जपणारा क्षण अनुभवायला मिळाला.
आई-वडिलांनंतर शाळेतील शिक्षक हे गुरू असतात. या तीन गुरूंच्या माध्यमातून लहान मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचं काम केलं जातं. त्यात शिक्षकांचा वाटा मोठा असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना तळमळीनं शिकवतात आणि त्यांना चांगला माणूस म्हणून घडवतात. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक घट्ट नातं निर्माण होतं. विद्यार्थ्यांचा जास्त वेळ हा शिक्षकांसोबत जात असल्यानं त्यांना काही शिक्षकांविषयी एक जिव्हाळा निर्माण होतो.जेव्हा आवडते शिक्षक बदली होतात तेव्हा विद्यार्थ्यांचे ह्रदय भरून येतं.असाच काहीसा एक ह्रदयस्पर्शी क्षण आवडत्या शिक्षिका स्वाती गोरे शिक्षिकेला निरोप देताना गावातील सरपंच,महिला,पुरुष,सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी निरोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच संदीप आजबे होते.तर प्रमुख पाहुणे संतोष चौधरी सर होते.विद्यार्थ्यांनी गोरे मॅडम यांच्या कार्याचा गुणगौरव आपल्या भाषणातून मांडला तर स्वतः बनवलेले भेटकार्ड आपल्या लाडक्या मॅडम देऊन कृतज्ञता व्यक्त केली.स्वाती गोरे मॅडम यांनी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्टीलचा जेवणाचा डबा व पाणी बॉटल भेट दिली. कार्यक्रमात बोलताना सेल्फ टॅक्स ऑफिसर नागेश अण्णा जाधव म्हणाले ,गोरे मॅडम आणि उंबरे सर यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांना मायेच्या ममतेन वागवून त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले आहे म्हणून आज या कार्यक्रमाला अनेक महिला हातातील काम सोडून गोरे मॅडम यांना निरोप देण्यासाठी जमले आहेत ,गोरे मॅडम आपल्या मनोगतात सांगितले मी सगळ्यात जास्त त्रास हा ग्रामपंचायत पदाधिकारी यांना दिला तो ही केवळ विद्यार्थी हितासाठी ग्रामपंचायत ने ही कधीच माझा शब्द पडू दिला नाही.तसेच माझी शाळेतील शिक्षिका म्हणून बदली झाली असली तरी मला मिळालेला हा एक चांगला आदर्श पुरस्कार आहे.
यावेळी अनेक शिक्षकांनी गोरे मॅडम यांच्या कार्याचा गुण गौरव करत मनोगते व्यक्त केली.संतोष भवर,गोरख मेहेत्रे,अशोक नेवसे,मार्केट कमिटीचे माजी संचालक सरपंच राजेंद्र दादा भोसले,गावचे सरपंच संदीप आजबे, नव्याने नियुक्त झालेले शिक्षक नवनाथ अडसूळ यांनी मनोगते व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमासाठी संतोष सोनवर,राम वारगड,अभिजित दिवटे,हरि(तात्या) पावणे,संदीप कुलकर्णी,शिवाजी बनाते,तालुकाध्यक्ष श्याम राठोड,दत्ता गदादे,नलिनी उंबरे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य सर्व पालक वर्ग माता भगिनी विद्यार्थी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ,ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नवनाथ अडसूळ सर यांचा स्वागताचा कार्यक्रम पुष्पवृष्टी टाकून झाला.गावकऱ्यांतर्फे गोड जेवण देण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राजेंद्र जरे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार भावका उंबरे यांनी केले.


