Breaking
ब्रेकिंग

विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती उत्साहात साजरी.

0 8 6 5 1 0

विश्वरत्न महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती उत्साहात साजरी…

राहुरी तालुका जावेद शेख

राहुरी शहरात ठिक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता राजवाडा येथील समाज मंदिरात उत्सव समिती चे अध्यक्ष विलास नाना साळवे यांच्या सह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
१४ एप्रिल २०२६ रोजी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ व्या जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. शहरातील जयभीम मित्र मंडळाच्या वतीने समाज मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये भिम गीतांचा कार्यक्रम, राज्य स्तरीय भिम काव्य स्पर्धा, महात्मा ज्योतिराव फुले जयंती निमित्त व्याख्यान, जादूचे प्रयोग व अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, महा आरोग्य शिबीर, होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम तसेच निबंध, वकृत्व, ग्रुप डान्स स्पर्धा त्याच बरोबर रेल्वे स्टेशन येथील वृद्धाश्रमात फळ व मिठाई वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
१४ एप्रिल रोजी सकाळच्या वेळी प्रथम मानवंदना घेण्यात आली. याप्रसंगी प्राजक्त तनपुरे, अक्षय कर्डिले, रावसाहेब खेवरे (नाना), नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, गटनेते हर्ष तनपूरे, तहसीलदार अमित पवार, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, नगरसेवक सोन्याबापू जगधने, राजेंद्र उंडे, माजी नगरसेवक दिपक साळवे, संजय साळवे, सुनील पवार, तसेच अण्णासाहेब शेटे, गणेश खैरे, सुनिल निमसे, संदिप राऊत, निलेश जगधने, पिंटूनाना साळवे, सुनिल चांदणे, निलेश शिरसाठ, सुजय काळे, सचिन मेहेत्रे, उमेश शेळके, अजित डावखर, अफनान आतार, मन्सूर पठाण, मोसीम कुरेशी, आदि मान्यवरांनी उपस्थित राहून डाॅ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याच बरोबर मौलाना आझाद नगर येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने डाॅ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर अध्यक्ष विलास नाना साळवे आणि उपाध्यक्ष पिंटू नाना साळवे यांच्या मार्गदर्शना खाली सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भव्य दिव्य मिरवणूक शांततेत पार पडली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयभीम मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे