मकाई कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारी द्या . . . अन्यथा . . . मुंबईत वर्षा बंगल्यासमोर उपोषण करणार – – – संतोष वारगड
अन्यथा . . . मुंबईत वर्षा बंगल्यासमोर उपोषण करणार - - - संतोष वारगड
मकाई कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारी द्या . . . मकाई कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारी द्या . . . अन्यथा . . . मुंबईत वर्षा बंगल्यासमोर उपोषण करणार – – – संतोष वारगड
करमाळा / विशेष प्रतिनिधी : सचिन जव्हेरी
मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या गेली सात वर्षापासून पगारी थकित असून आता या पगारी देण्यासाठी राज्य शासनाने 20 कोटी रुपये कारखान्याला उपलब्ध करून दिले आहेत
तरीसुद्धा कारखान्याचे संचालक मंडळ कर्मचाऱ्यांना पगारी देत नाही तात्काळ आठ दिवसाच्या सर्व मकाई कर्मचाऱ्यांना थकीत पगारी शिवाय त्यांचा प्रॉव्हिडंट फंड बँकेत भरणे .तसेच कर्मचाऱ्यांच्या नावावर काढलेली बँकेची कर्ज भरणे या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर शिवसेना शेतकरी सेने्यच्या च्या वतीने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यासमोर मकाईच्या पाचशे कर्मचाऱ्यांना घेऊन आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष वारगड यांनी दिला आहे शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख कैलास पाखरे तालुका उपाध्यक्ष अभिजीत शिर्के शिवसेना अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष
सिकंदर मुलानी यांनी दिला आहे
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश छोटे यांच्या नेतृत्वाखाली मकाईच्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशाराही संतोष वारगड यांनी दिला आहे
कर्मचाऱ्यांच्या सात वर्षापासून पगारी थकीत आहेत गेली पंधरा दिवसापासून मकाई चे सर्व कर्मचारी मकाई सहकारी साखर कारखान्यासमोर धरणे आंदोलन करत आहेत .तरीसुद्धा कारखान्याचे चेअरमन संचालक कोणीही या आंदोलनाची दखल घेत नाही साखर आयुक्तांकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा साखर आयुक्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे
राज्य शासनाने अडचणीत आलेल्या मकाई कारखान्याला 140 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे .ही मदत देताना कर्मचाऱ्यांचे सर्व देणे थकीत पगारी प्रायव्हिडंट फंड कर्मचाऱ्यांच्या नावावर काढलेली कर्ज यासाठी 20 कोटी रुपये राज्य शासनाने दिले आहेत
कर्मचाऱ्यांसाठी दिलेली रक्कम स्वतःच्या स्वार्थासाठी संचालक मंडळ दुसरीकडे वापरत आहे
व्यापारी देणे देण्यासाठी 48 कोटी रुपये राज्य शासनाने दिले आहेत ही रक्कम मात्र संचालक मंडळांनी तात्काळ व्यापाऱ्यांना अदा केली आहे
पण ज्या कामगारांनी गेली सात वर्ष घाम गाळून कारखाना चालवला .पगार नसताना सुद्धा कारखान्याची एकनिष्ठ राहिली आता मात्र शासनाने पैसे देऊन सुद्धा कर्मचाऱ्यांचे पगार संचालक मंडळ देत नाही कर्मचाऱ्यांना आठ दिवसाच्या त्यांचे हक्काचे पैसे न दिल्यास मुंबई येथील मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यासमोर मकाई चे सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा शिवसेना शेतकरी सेनेने दिला आहे .


