लोकशाहीला बळकट करण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिन साजरा होणार*
*लोकशाहीला बळकट करण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिन साजरा होणार*
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर तालुक्यात दिनांक: १९ मे २०२५ सकाळी ११:०० वा. | स्थळ: उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमळनेर येथे लोकशाहीला बळकट करण्यासाठी आणि नागरिकांच्या अडचणी, तक्रारी स्थानिक पातळीवर तातडीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.त्याअनुषंगाने, ता. १९ मे २०२५ रोजी (सोमवार) सकाळी ११:०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमळनेर येथे तालुका स्तरीय लोकशाही दिन साजरा केला जाणार आहे.या लोकशाही दिनासाठी अमळनेर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार असून, नागरिकांना त्यांच्या अडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.नागरिकांनी आपल्या तक्रारी संबंधित पुराव्यांसह दिनांक १९ मे २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर कराव्यात.
प्रमुख तक्रारी विषय:
• महसूल संबंधित अडचणी
• जमीन व मालमत्ता विषयक तक्रारी
• शासकीय सामाजिक योजनांची अंमलबजावणी
• विविध सरकारी विभागांशी निगडित अडचणी
• शासकीय सेवा व सुविधांशी संबंधित इतर समस्या
या बैठकीत प्रत्येक तक्रारीवर संक्षिप्त सुनावणी घेऊन त्वरित कार्यवाही करण्यात येईल.लोकशाही दिन म्हणजे शासनाशी थेट संवाद साधण्याची अनमोल संधी!
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, आपल्या समस्या मांडाव्यात आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अमळनेर व तहसिलदार अमळनेर यांनी केले आहे.



